कतरिना कैफ व विकी कौशलची अशी सुरू झाली होती ‘प्यारवाली लव्हस्टोरी’! सलमानसमोर केले होते प्रपोज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 08:00 AM2021-06-11T08:00:00+5:302021-06-11T08:00:04+5:30

रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅट सिंगल होती. अशात विकी तिच्या आयुष्यात आला आणि बघता बघता दोघेही एकमेकांत गुंतले.

vicky kaushal katrina kaif love story how it all started |  कतरिना कैफ व विकी कौशलची अशी सुरू झाली होती ‘प्यारवाली लव्हस्टोरी’! सलमानसमोर केले होते प्रपोज!!

 कतरिना कैफ व विकी कौशलची अशी सुरू झाली होती ‘प्यारवाली लव्हस्टोरी’! सलमानसमोर केले होते प्रपोज!!

googlenewsNext
ठळक मुद्दे2019 मध्ये एका अवार्ड फंक्शनमध्ये विकी कौशलने सलमान खानसमोर कॅटला प्रपोज केले होते. सलमानची त्यावरची रिअ‍ॅक्शन त्यावेळी बघण्यासारखी होती.

विकी कौशल (Vicky Kaushal) व कतरिना कैफ (Katrina Kaif) हे बॉलिवूडचे दोन लव्ह बर्ड्स सध्या जाम चर्चेत आहेत. गेल्या वर्षी या दोघांच्या डेटींगची चर्चा सुरू झाली होती. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅट सिंगल होती. अशात विकी तिच्या आयुष्यात आला आणि बघता बघता दोघेही एकमेकांत गुंतले. म्हणायला विकी व कतरिना दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबद्दल मौन बाळगले आहे. पण कालच हर्षवर्धन कपूरने  (Harshvardhan Kapoor)सांगायचे ते सांगितलेय. विकी व कतरिना सोबत आहेत आणि हे खरे आहे, असे त्याने सांगितले आणि दोघांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले आहे. आज आम्ही तुम्हाला रिलेशनशिपची सुरूवात कशी झाली होती, हे सांगणार आहोत.

तर कॅट व विकी यांना जवळ आणण्यात करण जोहरचे (Karan Johar) मोठे योगदान आहे. होय, करण जोहर एक मोठा निर्माता व दिग्दर्शक आहे. सोबत बॉलिवूड पार्ट्यांचा खास होस्टही आहे. करणच्या पार्टीमध्ये अनेकदा विकी व कॅट दिसले आहेत. विकी व कॅटच्या रिलेशनची सुरूवात एकार्थाने करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये झाली होती.

2018 मध्ये ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये काऊचवर कतरिना बसली होती. नेहमीप्रमाणे करणने कॅटला प्रश्न केला होता. तुझ्यासोबत कोणत्या हिरोची जोडी परफेक्ट दिसेन? असा तो प्रश्न होता. यावर कतरिनाने विकी कौशल असे उत्तर दिले होते. यानंतर यानंतरच्या ‘कॉफी विद करण’च्या एपिसोडमध्ये विकी व आयुष्यमान खुराणा सहभागी झाले होते. यावेळी करणने अगदी आठवणीने कतरिनाची ही गोष्ट विकीला सांगितली होती.   मी आनंदाने बेशुद्ध पडेन, असे ही गोष्ट ऐकल्यानंतर विकी म्हणाला होता. ‘कॉफी विद करण’च्या या एपिसोडनंतर जवळजवळ वर्षभरानंतर खरोखर विकी व कतरिना सोबत दिसू लागले होते.

सलमानसमोर केले होते प्रपोज

2019 मध्ये एका अवार्ड फंक्शनमध्ये विकी कौशलने सलमान खानसमोर कॅटला प्रपोज केले होते. सलमानची त्यावरची रिअ‍ॅक्शन त्यावेळी बघण्यासारखी होती. अर्थात हे प्रपोजल गमतीचा एक भाग होता. पण यानंतर कॅट व विकीची मैत्री ख-या अर्थाने वाढली होती. पुढे मैत्री झाली, तसे प्रेम झाले. आज काय तर विकी व कॅट एकमेकांसोबत आहेत.

Web Title: vicky kaushal katrina kaif love story how it all started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.