-म्हणून विकी व कतरिनाला लीक होऊ द्यायचा नाही लग्नाचा एकही फोटो... चर्चा तर हीच...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 15:23 IST2021-12-02T15:22:49+5:302021-12-02T15:23:12+5:30
Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दोघांचा प्रचंड आटापीटा सुरू आहे. याला कारणही खास आहे. होय, एक ताजी अपडेट समोर येतेय.

-म्हणून विकी व कतरिनाला लीक होऊ द्यायचा नाही लग्नाचा एकही फोटो... चर्चा तर हीच...!!
विकी कौशल (Vicky Kaushal) व कतरिना कैफ (Katrina Kaif) दोघंही लग्नाबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. पण सोशल मीडियावर या लग्नांच्या बातम्यांचा जणू पूर आला आहे. विकी व कॅट येत्या 9 डिसेंबरला लग्नगाठ बांधणार असल्याचं मानलं जातेय. लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. विकी व कतरिनाच्या लग्नावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दोघांचा प्रचंड आटापीटा सुरू आहे. याला कारणही खास आहे. होय, एक ताजी अपडेट समोर येतेय.
विकी व कॅटने आपल्या लग्नाचे फोटो व व्हिडीओचे राईट्स एका मोठ्या मॅगझिनला विकल्याचे कळतेय. Bollywoodlifeनं याबाबतचे वृत्त दिलं आहे.
कपलच्या एका जवळच्या सूत्राच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, विकी व कतरिनाने लग्नाचे फोटो व व्हिडीओचे राईट्स एका आंतरराष्ट्रीय मॅगझिनच्या भारतीय आवृत्तीला विकले आहेत. या मोबदल्यात मोठी रक्कम कपलला मिळणार आहे. कतरिना व तिच्या टीमने मॅगझिनच्या लोकांची चर्चा केली आणि मोठ्या रकमेची एक डील फायनल झाली. त्यामुळे विकी व कॅटच्या लग्नाचे अगदी काही निवडक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतील आणि ते सुद्धा स्वत: कपल शेअर करेल.श
याआधी प्रियंका चोप्रा व निक जोनास यांनीही असं केलं होतं.
2018 मध्ये या दोघांच्या लग्नाच्या फोटोचे राईट्स सुमारे 2.5 मिलियन अमेरिकन डॉलरला विकले गेले होते.
कतरिनाने कोणत्या मॅगझिनला फोटोचे राईट्स विकलेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण कतरिना अनेकदा वोग मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. या मॅगझिनची फॅशन डिझाईनर अनैता श्रॉफ कतरिनाची चांगली मैत्रिण आहे. अशात कतरिना व विकीने याच मॅगझिनसोबत डील फायनल केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आता खरं काय ते लवकर कळेलंच.