Vicky Kaushal : पंजाबी विकी कौशलचा आवडता मालवणी पदार्थ कोणता? म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 17:10 IST2024-07-18T16:42:26+5:302024-07-18T17:10:38+5:30
नुकतेच एका मुलाखमध्ये विकीनं त्याच्या आवडीच्या पदार्थांची नावे सांगितली.

Vicky Kaushal : पंजाबी विकी कौशलचा आवडता मालवणी पदार्थ कोणता? म्हणाला...
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल ( Vicky Kaushal ) सध्या त्याच्या 'बॅड न्यूज' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अभिनेता एमी विर्क यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 'बॅड न्यूज' सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. सिनेमाच्या प्रमोशनसाठी विकी विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतेच एका मुलाखमध्ये विकीनं त्याच्या आवडीच्या पदार्थांची नावे सांगितली.
विकी हा जेवणाचा खूप शौकीन आहे. विकीला महाराष्ट्रीय पदार्थ खायलाही खूप आवडतात. नुकतंच विकीनं 'Mashable इंडिया' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी आवडत्या पदार्थांविषयी विचारल्यावर तो म्हणाला, 'शूटिंगवरून थकून घरी आल्यावर मला साधा डोसा, खोबऱ्याची चटणी, चिकन लॉलीपॉप विथ शेजवान चटणी हे पदार्थ खायला खूप आवडतात. याशिवाय मी मालवणी पदार्थांचा खूप मोठा चाहता आहे. मला बोबींल फ्राय खूप आवडतं. ते मी नेहमी खातो'.
विकी हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. विकीचा 'बॅड न्यूज' सिनेमा १९ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाआधीच 'बॅड न्यूज' सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. आत्तापर्यंत विकी कौशल आणि तृप्तीच्या 'बॅड न्यूज' सिनेमाची तब्बल ३८ हजार ५९४ तिकीटे विकली गेली आहेत. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, अॅडव्हान्स बुकिंगमधून या सिनेमाने १.०८ कोटींची कमाई केली आहे.