'2023 चं दिवाळी गिफ्ट...'; विकी कौशलने बायकोचे केले तोंडभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 12:27 PM2023-11-12T12:27:12+5:302023-11-12T12:30:38+5:30

अभिनेता विकी कौशलने बायको कतरिनाचे कौतुक केले आहे. 

Vicky Kaushal praised Salman Khan, Katrina Kaif-Emraan Hashmi’s film | '2023 चं दिवाळी गिफ्ट...'; विकी कौशलने बायकोचे केले तोंडभरुन कौतुक

'2023 चं दिवाळी गिफ्ट...'; विकी कौशलने बायकोचे केले तोंडभरुन कौतुक

अभिनेता सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दिवाळीच्या मुहुर्तावर 12 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ धमाल करताना दिसले. अभिनेता विकी कौशलने बायको कतरिनाचे कौतुक केले आहे. 

विकी कौशल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्याने लिहलं, '2023 चं दिवाळी गिफ्ट!!! #Tiger3 एक मस्त सिनेमा आहे.  टायगर, झोया, आतिश सर्वांचे खूप खूप अभिनंदन'. 'टायगर 3' ला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत असल्याचे दिसत आहे. चित्रपटात कतरिना आणि सलमान जबरदस्त अ‍ॅक्शन करताना पाहायाल मिळत आहेत.  

टायगर 3 मधून सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी अनेक वर्षांनंतर थिएटरमध्ये परतली आहे. या दोघांनी आतापर्यंत 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' असे दोन बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.  ३०० कोटींचं बजेट असलेला 'टायगर ३' बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडित काढणार असल्याचे म्हटलं जात आहे. 

Web Title: Vicky Kaushal praised Salman Khan, Katrina Kaif-Emraan Hashmi’s film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.