"प्रत्येक दिवशी शिवगर्जना करूनच शूटिंगला सुरुवात", विकीनं सांगितलं कसं झालं 'छावा'चं शूटिंग!

By मयुरी वाशिंबे | Updated: February 6, 2025 19:25 IST2025-02-06T19:17:29+5:302025-02-06T19:25:27+5:30

'छावा' या हिंदी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे.

Vicky Kaushal Promotes His Upcoming Movie Chhaava In Chhatrapati Sambhaji Nagar Reveals Cinema Shooting Experience Maratha Warrior Sambhaji Maharaj | "प्रत्येक दिवशी शिवगर्जना करूनच शूटिंगला सुरुवात", विकीनं सांगितलं कसं झालं 'छावा'चं शूटिंग!

"प्रत्येक दिवशी शिवगर्जना करूनच शूटिंगला सुरुवात", विकीनं सांगितलं कसं झालं 'छावा'चं शूटिंग!

लक्ष्मण उतेकर  (laxman utekar) दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) या हिंदी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने छत्रपती संभाजी महाराजांची आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाने  (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंची भुमिका साकारली आहे. छावा' सिनेमाचा टीझर, ट्रेलरनंतर आता प्रत्यक्ष सिनेमा पाहायला लोक उत्सुक आहेत. सध्या विकी कौशल 'छावा'च्या प्रमोशनसाठी सगळीकडे फिरतोय. आज सिनेमाच्या प्रमोशनसाठी विकी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) पोहचला.  यानिमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने विविध प्रश्नांची उत्तर दिली. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहचण्याआधी विकीनं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. याबद्दल तो म्हणाला, "ऐतिहासिक शहरात येण्याआधी मी वेरूळ घृष्णेश्वरला जाऊन ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतले. मी या भागातच पहिल्यांदा आलो, ज्योतिर्लिंगाचे दर्शनही पहिल्यांदा घेतले. हा परिसर देखील खूप सुंदर आणि समृद्ध आहे". यासोबतच तो म्हणाला, "मी आज सकाळी छत्रपती संभाजी नगर शहरात आलो. ज्यांच्या नावावर हे शहर आहे. त्यांच्या वडिलांचा अर्थात शिवरायांचा पुतळा मी क्रांती चौकात पाहिला, तो पाहून तिथेच बसून राहावे, असे वाटले. फार सुंदर हा परिसर आहे", या शब्दात विकीनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कौतुक केलं.  

'छावा' सिनेमाच्या शुटिंगबद्दल बोलताना तो म्हणाला, "सिनेमाची भव्यदिव्यता, त्याचे बॅकग्राऊंड म्युझिक, गाण्यांसाठी असलेले ज्येष्ठ संगीतकार ए.आर. रहमान यांचे संगीत या जमेच्या बाजू आहेत. उतेकर यांनी फार बारकाईने अभ्यास करत हा सिनेमा बनवल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात जिथे-जिथे महारांजाचे पाय लागलेत. रायगड असो किंंवा इतर किल्ले असो. प्रत्येक ठिकाणी जाऊन संपुर्ण माहिती गोळा करण्यात आली. अभ्यास करण्यात आला. सिनेमाचा सेट अगदी जशाच तसा बनवण्यात आलाय. सिनेमात परिधान करण्यात आलेले कपडे लोकल कारागिरांकडून बनवण्यात आले आहेत, दागिणे बनवण्यात आले. यासाठी पुर्ण एक वर्ष लागलं. पुढची ३५० वर्ष लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे, असा एक भव्य चित्रपट बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. राजेंचं वैभव तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल.  संपुर्ण जगाला कळालं पाहिजे की आपला राज कसा होता. यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेतलीय, असं विकी म्हणाला.


ऐतिहासिक भुमिका साकारताना मनात असलेल्या भीतीबद्दल तो म्हणाला, "ऐतिहासिक चित्रपटासोबत भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे तुमचा हेतू नेमका काय आहे, हे फार महत्त्वाचं असतं. छावा सिनेमासाठी काम केलेल्या प्रत्येक व्यक्तीची नियत खूप स्वच्छ होती. चित्रपटाचं १०० दिवसाचं शुटिंग होतं, तर एकही दिवस असा गेला नाही. ज्यादिवशी आम्ही शिवगर्जना केली नसेल. शिवगर्जना केल्यानंतर आम्ही शुटिंगला सुरुवात करायचो". दरम्यान, छावा हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारी २०२५ ला संपूर्ण जगभरात रिलीज होतोय. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसणार आहे. सिनेमात संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे हे मराठी कलाकारही दिसणार आहेत. 

Web Title: Vicky Kaushal Promotes His Upcoming Movie Chhaava In Chhatrapati Sambhaji Nagar Reveals Cinema Shooting Experience Maratha Warrior Sambhaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.