"राज ठाकरे सरांना मी कणा शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा..".; विकी कौशलने सांगितला खास किस्सा

By देवेंद्र जाधव | Updated: February 28, 2025 09:21 IST2025-02-28T09:21:17+5:302025-02-28T09:21:48+5:30

विकी कौशलने काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वांसमोर राज ठाकरेंचा खास किस्सा सांगितला (raj thackeray, vicky kaushal)

vicky kaushal recite poem of kana written by kusumagraj infront raj thackeray marathi bhasha din | "राज ठाकरे सरांना मी कणा शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा..".; विकी कौशलने सांगितला खास किस्सा

"राज ठाकरे सरांना मी कणा शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा..".; विकी कौशलने सांगितला खास किस्सा

विकी कौशल (vicky kaushal) हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामागचं कारण आपल्या सर्वांना माहितच आहे ते म्हणजे, विकी कौशलची भूमिका असलेला 'छावा' सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. काल २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर एक खास कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळी विकीने कुसुमाग्रजांची 'कणा' कविता सादर केली. त्यानिमित्त विकीने सर्वांशी बोलताना खास किस्सा सांगितला. 

विकीने सांगितला राज ठाकरेंसोबतचा खास किस्सा

विकीला मंचावर आमंत्रित करण्यात आलं. त्यावेळी विकीने सर्वांना खास किस्सा सांगितला. विकीला राज ठाकरेंनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांची 'कणा' कविता वाचायला सांगितलं. विकीला 'कणा' शब्दाचा अर्थ माहित नसल्याने त्याने राज ठाकरेंना त्या शब्दाचा अर्थ विचारला. तेव्हा राज ठाकरेंनी कणा म्हणजे Spine असा अर्थ विकीला सांगितला. 'छावा' सिनेमा केल्यानंतर मला कणा शब्दाचा खरा अर्थ समजला, अशी भावना विकीने व्यक्त केली.




विकीने पुढे भाषणात सांगितलं की, "जय भवानी, जय शिवराय. खरं सांगू तर खूप नर्व्हस फील करतोय. मी मराठी बोलू शकतो. दहावीपर्यंत मी मराठी शिकलोय. दहावीत इंग्रजीपेक्षा मराठीत जास्त मार्क्स आले होते. पण माझी मराठी इतकी छान नाहीये. त्यामुळे भूलचुक माफ. जावेद साबनंतर इथे येणं आणि ते सुद्धा मराठीमध्ये कविता वाचणं म्हणजे माझ्या आयुष्यातील हा सर्वात जास्त नर्व्हस करणारा क्षण आहे. त्यामुळे प्लीज भूलचुक माफ करा." असं म्हणत विकीने त्याच्या खास शैलीत कुसुमाग्रजांची 'कणा' कविता वाचली आणि सर्वांचं मन जिंकलं.

Web Title: vicky kaushal recite poem of kana written by kusumagraj infront raj thackeray marathi bhasha din

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.