16 शहरांमध्ये 110 दिवस शुटिंग, विकीची 6 महिने प्रचंड मेहनत; असा तयार झाला 'सॅम बहादूर' सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 11:54 AM2023-11-17T11:54:23+5:302023-11-17T11:59:06+5:30
विकीचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. विकीचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चाहत्यांची या चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. केवळ चित्रपटाच्या ट्रेलरमधील विकीचा अभिनय पाहून चाहतेच नाही तर बॉलिवूड अभिनेतेही भारावून गेले आहेत.
विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा सिनेमा देशाचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला समर्पित आहे. या चित्रपटातील 'सॅम माणेकशॉ' यांची भुमिका साकारण्यासाठी विकीने 6 महिने प्रचंड मेहनत घेतली. यासाठी विकीने सॅम माणेकशॉच्या नातेवाईकांव्यतिरिक्त काही अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.
या चित्रपटाचे शूटिंग एकूण 110 दिवसांत देशातील 16 शहरांमध्ये झाले आहे. भारत-पाकिस्तान युद्धाचे शुटिंग हे कोलकातामध्येच सीक्वेन्स शूट करण्यात आला. चित्रपटाच्या शूटिंगसाठी संरक्षण मंत्रालयाकडून खूप मदत मिळाली.
सॅम बहादूर' चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्राने सॅम बहादूर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. 1 डिसेंबरला बहुचर्चित 'सॅम बहादूर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निर्मात्यांचा हा प्रयत्न आहे.