घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; अभिनेता म्हणाला, "काल त्यांनी छावा पाहिला..."
By ऋचा वझे | Updated: February 21, 2025 15:11 IST2025-02-21T15:11:22+5:302025-02-21T15:11:57+5:30
विकीने शेअर केला हा भावुक व्हिडिओ

घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; अभिनेता म्हणाला, "काल त्यांनी छावा पाहिला..."
विकी कौशल (Vicky Kaushal) म्हणजे 'छावा' (Chhaava) असंच सध्या समीकरण झालं आहे. त्याने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. पठ्ठ्याने अगदी कमाल काम केलं आहे. विकी कौशल बरीच मेहनत घेऊन आज इथवर पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा सर्वांनाच गर्व वाटतो. आपल्यालाच जर असं वाटेल तर त्याच्या कुटुंबियांना तर किती अभिमान वाटत असेल विचार करा. नुकतंच विकीने भावुक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये विकीच्या घरी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीनेही त्याची दृष्ट काढली आहे.
विकी कौशल घरात खोलीबाहेर उभा आहे. समोर त्यांच्या घरातील मदनतीस आशा ताई आहेत ज्या साडी नेसून उभ्या आहेत. विकीची त्या दृष्ट काढताना दिसत आहे. विकीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "आशा ताईंनी मला मोठं होताना बघितलं उंचीनेही आणि आयुष्यातही. काल त्यांनी छावा बघितला आणि मला म्हणाल्या, 'उभे राहा, तुमची नजर उतरवायची आहे' त्या आधीपासूनच अशा प्रकारे त्यांचं माझ्यालवर असेलेलं प्रेम दाखवतात. त्या माझ्या आयुष्यात आहेत याचा मला खूप आनंद वाटतो."