"जिंदगी उनकी, इतिहास हमारा" विकी कौशलच्या 'सॅम बहादुर'चं पहिलं पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:34 AM2023-10-12T11:34:51+5:302023-10-12T11:53:35+5:30
विकी कौशलने 'सॅम बहादुर' चित्रपटाचे पहिलं पोस्टर विकीन सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. विकीचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातच या चित्रपटाचे पहिलं पोस्टर विकीन सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटामधील विकी कौशलचा लूक पाहायला मिळतोय.
'सॅम बहादूर'च्या पोस्टरमध्ये विकीच्या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळत आहे. यात विकी भारतीय लष्कराच्या गणवेशात दिसत आहे. तर पोस्टरवर लिहलं आहे की,"जिंदगी उनकी, इतिहास हमारा". या पोस्टरवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षांव केलाय.
सॅम बहादुर हा चित्रपट बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. 'सॅम बहादुर' चित्रपटाचे कथानक हे देशाचे पहिले फिल्ड सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. 1971 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात सॅम माणेकशॉ यांनी अवघ्या 13 दिवसांत शत्रूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते.
सॅम बहादूरचा टीझर 13 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात स्टार नेटवर्क प्लॅटफॉर्मवर लाँन्च करण्यात येणार आहे. यासाठी निर्मात्यांनी स्टार नेटवर्कशी करार केला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक सामना हा वर्षातील सर्वात मोठा सामना आहे. 5 कोटींहून अधिक भारतीय तो पाहू शकतात. सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निर्मात्यांचा हा प्रयत्न आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा ही सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू मंकशॉची भूमिका साकारणार आहे आणि फातिम सना शेख या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.