Chhaava Movie : विकी कौशलने दाखवली पडद्यामागच्या योद्धाची झलक, 'छावा'साठी त्यांनीही घेतली मेहनत, अभिनेत्याने मानले आभार
By तेजल गावडे | Updated: March 3, 2025 08:04 IST2025-03-03T08:03:42+5:302025-03-03T08:04:17+5:30
Chaava Movie : गेल्या काही दिवसापासून अभिनेता विकी कौशल 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Chhaava Movie : विकी कौशलने दाखवली पडद्यामागच्या योद्धाची झलक, 'छावा'साठी त्यांनीही घेतली मेहनत, अभिनेत्याने मानले आभार
गेल्या काही दिवसापासून अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सतत चर्चेत आहे. तो 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉलिवूडपासून साउथ सिनेमाच्या मोठ्या मोठ्या सिनेमांना मागे टाकले आहे. विकी कौशल सोशल मीडियावर सिनेमाच्या संदर्भात सातत्याने पोस्ट शेअर करताना दिसतोय. दरम्यान आता त्याने पडद्यामागे त्याच्यासोबत काम करणाऱ्या योद्धाची ओळख करुन दिली आहे.
विकी कौशलने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात तो शूटच्या आधी शरीरयष्टी पिळदार दिसण्यासाठी डंबेल्सने बायसेप्स मारताना दिसतो आहे. यावेळी त्याच्यासोबत फिटनेस ट्रेनरही दिसतो आहे. हा फोटो शेअर करत विकीने लिहिले की, मला सिनेमात परफेक्ट दिसण्यासाठी योद्धांची टीम घ्यावी लागली. इथे मी माझा माणूस तेजस लालवानीसोबत आहे. प्रत्येक पावलांवर उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद मित्रा. मास्टरमाइंड क्रिस गेथिन फ्रेममध्ये मिसिंग आहे. विकी कौशलच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने आमचं राजं अशी कमेंट केलीय.
५०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार छावा
१७ दिवसांनंतर विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या छावा या चित्रपटाने जवळपास ४८० कोटींचा व्यवसाय केला आहे. या पार्श्वभूमीवर हा चित्रपट लवकरच ५०० कोटींचा आकडा गाठणार आहे. या वर्षीच्या सर्वाधिक कमाईच्या बाबतीत छावाने इतिहास रचला आहे आणि ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून हा चित्रपट एक नवीन यश मिळवणार आहे. छावापूर्वी शाहरुख खानचा पठाण, जवान, राजकुमार राव स्त्री २, रणबीर कपूरचा अॅनिमल आणि सनी देओलचा गदर २ यांसारख्या हिंदी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला जमवला आहे. अशा परिस्थितीत छावाचेही नाव या यादीत समाविष्ट होणार आहे.