'छावा'ची डरकाळी! ४२ व्या दिवशीही कोटींच्या घरात कमाई; एकूण आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 10:23 IST2025-03-28T10:22:11+5:302025-03-28T10:23:11+5:30

'छावा'चीआता सलमानच्या 'सिकंदर' आणि मोहनलाल यांच्या 'एल2 एम्पुरान' सिनेमाशी स्पर्धा असणार आहे.

vicky kaushal starrer chhaava movie entered in sixth week know total box office collection | 'छावा'ची डरकाळी! ४२ व्या दिवशीही कोटींच्या घरात कमाई; एकूण आकडा वाचून व्हाल थक्क

'छावा'ची डरकाळी! ४२ व्या दिवशीही कोटींच्या घरात कमाई; एकूण आकडा वाचून व्हाल थक्क

Chhaava movie collection: आजकाल चित्रपट ३ आठवडेही थिएटरमध्ये तग धरुन राहणं अवघड झालं आहे. मात्र 'छावा' सिनेमाने कमालच केली आहे. काल सिनेमाने ४२ व्या दिवशीही कोटींच्या घरात कमाई केली आहे. विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा'ची डरकाळी थिएटरमध्ये अजूनही ऐकू येत आहे. एकूणच सिनेमा ६०० कोटींच्या घरात पोहोचण्याच्या तयारित आहे. सिनेमाला अजूनही प्रेक्षक थिएटरमध्ये उपस्थित राहून तुफान प्रतिसाद देत आहेत.

आतापर्यंतची कमाई किती?

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमावर पैशांचा पाऊसच पडत आहे. सिनेमा एकानंतर एक रेकॉर्ड मोडत आहे. सिनेमाची वाटचाल पाहता काहीच दिवसात ६०० कोटींचा आकडाही पार होईल असा अंदाज आहे. सॅक्निकच्या रिपोर्टनुसार, सिनेमाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.०५ कोटी, चौथ्या आठवड्यात ५५.९५ कोटी आणि पाचव्या आठवड्यात ३३.३५ कोटींची कमाई केली. आता सहाव्या आठवड्यात पदार्पण केलेल्या 'छावा'ने ३६ व्या दिवशी २.१ कोटी, ३७ व्या दिवशी ३.६५ कोटी, ३८ व्या दिवशी ४.६५ कोटी, ३९ व्या दिवशी १.६ कोटी, ४० दिवशी १.५ कोटी आणि ४१ दिवशी १.४ कोटी कमावले. तर काल ४२ व्या दिवशीही 'छावा'ची कमाई १.४ कोटींची झाली आहे. हा आकडा थक्क करणारा आहे. 

सिनेमाने आतापर्यंत एकूण ५८९.१५ कोटी कमावले आहेत. तर जगभरात सिनेमा ७०० कोटी पार गेला आहे. आता लवकरच सिनेमा ६०० कोटी पार बिझनेस करेल असा अंदाज आहे.  तिकडे साउथमध्ये मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचा 'एल2 एम्पुरान' सिनेमा रिलीज झाला आहे. तर आता सलमान खानचा 'सिकंदर'ही २ दिवसात रिलीज होत आहे. त्यामुळे 'छावा'च्या कमाईत घट होते का हे पाहणे महत्वाचे आहे. 

Web Title: vicky kaushal starrer chhaava movie entered in sixth week know total box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.