Animal Park मध्ये बॉबी देओलची जागा घेणार 'हा' अभिनेता, रणबीर कपूरला देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 12:10 PM2024-12-11T12:10:14+5:302024-12-11T12:10:36+5:30

'ॲनिमल पार्क'मध्ये आणखी एका अभिनेत्याची खलनायक म्हणून एन्ट्री होणार आहे.

Vicky Kaushal To Replace Bobby Deol As A Villain In Ranbir Kapoor-starrer Animal Park | Animal Park मध्ये बॉबी देओलची जागा घेणार 'हा' अभिनेता, रणबीर कपूरला देणार टक्कर!

Animal Park मध्ये बॉबी देओलची जागा घेणार 'हा' अभिनेता, रणबीर कपूरला देणार टक्कर!

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा कायमच चर्चेत असतो. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रणबीरचे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहेत. 2018 ते 2021 या चार वर्षांच्या ब्रेकनंतर रणबीने 2022 मध्ये 'ब्रह्मास्त्र' सिनेमा केला आणि या सिनेमानं खूप चांगले कलेक्शन केले. यानंतर 'तू झूठी मैं मक्कार' आणि संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल' सिनेमानं निर्मात्यांचे खिसे भरले. 

'ॲनिमल'चा दुसऱ्या भागाचीही घोषणा करण्यात आली आहे. 'ॲनिमल पार्क' (Animal Park) असं दुसऱ्या भागाचं नाव असणार आहे.  रणबीर कपूरने चित्रपटाच्या शूटिंगबाबत अपडेट दिले आहे.  डेडलाइन मॅगझिनशी खास संवाद साधताना रणबीर कपूरने 'ॲनिमल पार्क' चित्रपटाच्या शूटिंगबाबत एक मोठे अपडेट शेअर केले. तो म्हणाला, "दिग्दर्शक सध्या दुसरा चित्रपट बनवत आहेत. आम्ही 2027 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू करू".

'ॲनिमल पार्क'मध्ये आणखी एका अभिनेत्याची खलनायक म्हणून एन्ट्री होणार आहे.  बॉबी देओलने (Bobby Deol) 'ॲनिमल' चित्रपटात अबरार हकची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका 15 ते 20 मिनिटांची होती. बॉबी देओलने काहीही न बोलता त्याची भूमिका ज्या पद्धतीने साकारली ते पाहून सगळेच थक्क झाले. मात्र, त्याचे पात्र पहिल्या भागातच संपले होते, त्यामुळे तो 'ॲनिमल पार्क'मध्ये दिसणार नाही. रिपोर्टनुसार,  चित्रपटात एक नाही तर दोन खलनायक दिसणार आहेत. पहिला अजिज, जो अबरार हकचा धाकटा भाऊ आहे आणि त्याला रणविजय (रणबीर कपूरचे पात्र) चे रूप देण्यासाठी ज्याची प्लास्टिक सर्जरी केली जाते. दुसरा खलनायक दुसरा कोणी नसून रणबीर कपूरचा जवळचा मित्र विकी कौशल  (Vicky Kaushal) दिसणार असल्याचं बोललं जात आहे. 

'ॲनिमल पार्क'मध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशलची जोडी दिसली, तर ती त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असेल. यापूर्वी 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'संजू' चित्रपटात विक्की कौशलने त्याच्या मित्र 'कमली'ची भूमिका साकारली होती. याशिवाय दोघेही लवकरच 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहेत. ज्यामध्ये त्यांच्यासोबत आलिया भटही असेल. रणबीर कपूरकडे आगामी काळात अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. 'ॲनिमल पार्क'व्यतिरिक्त, तो नितेश तिवारीच्या पौराणिक चित्रपट 'रामायण' मध्ये 'श्री राम' यांची भूमिका साकारताना दिसणार आहे, ज्यामध्ये तो प्रथमच दक्षिण अभिनेत्री साई पल्लवी सोबत स्क्रीन शेअर करेल. हा चित्रपट 2026 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Vicky Kaushal To Replace Bobby Deol As A Villain In Ranbir Kapoor-starrer Animal Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.