अबब! विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'ची रिलीजआधीच कोट्यावधींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 03:34 PM2024-07-18T15:34:30+5:302024-07-18T15:37:58+5:30

'बॅड न्यूज' सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. प्रदर्शनाआधीच 'बॅड न्यूज' सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे.

vicky kaushal tripti dimri bad news advanced booking movie earned 1cr before release | अबब! विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'ची रिलीजआधीच कोट्यावधींची कमाई

अबब! विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'ची रिलीजआधीच कोट्यावधींची कमाई

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या 'बॅड न्यूज' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अभिनेता एमी विर्क यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 'बॅड न्यूज' सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. या सिनेमातील गाणीही हिट ठरली आहेत. त्यामुळेच 'बॅड न्यूज' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. 

'बॅड न्यूज' सिनेमा १९ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या अॅडव्हानस बुकींगला सुरुवात झाली असून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाआधीच 'बॅड न्यूज' सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. आत्तापर्यंत विकी कौशल आणि तृप्तीच्या 'बॅड न्यूज' सिनेमाची तब्बल ३८ हजार ५९४ तिकीटे विकली गेली आहेत. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, अॅडव्हान्स बुकिंगमधून या सिनेमाने १.०८ कोटींची कमाई केली आहे. 

आनंद तिवारी दिग्दर्शित 'बॅड न्यूज' सिनेमा पहिल्या दिवशी ५-७ कोटींची कमाई करण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या सिनेमातील विकी-तृप्तीची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 'बॅड न्यूज' सिनेमा नेहा धुपियादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात कतरिना कैफ, अनन्या पांडे, टायगर श्रॉफ कैमिओ करणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: vicky kaushal tripti dimri bad news advanced booking movie earned 1cr before release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.