'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 11:51 AM2024-11-13T11:51:15+5:302024-11-13T11:51:56+5:30

'छावा' नंतर विकीच्या 'महावतार' सिनेमाची घोषणा

Vicky Kaushal will play the role of Lord Parashuram in the movie title Mahavatar | 'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट

'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट

अभिनेता विकी कौशलचं (Vicky Kaushal) सध्या नशीब जोरात आहे. त्याचा आगामी 'छावा' सिनेमा चर्चेत असतानाच आता आणखी एका सिनेमाची घोषणा झाली आहे. विकी कौशलचा 'महावतार' सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. सात चिरंजीवींमधील एक परशुराम यांच्यावर सिनेमा आधारित आहे. विकी कौशलचा सिनेमातील लूक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. 'छावा'चे निर्माते दिनेश विजान यांच्याच मॅडॉक फिल्म्सने 'महावतार'ची निर्मिती केली आहे.

शस्त्र, शास्त्रात पारंगत, अधर्मीयांचा नाश, निसर्ग संवर्धनाला हातभार, स्त्रीसबलीकरणाला प्रोत्साहन, वैदिक धर्माचा प्रसार आणि मातृ पितृ भक्ती अशी ख्याती असलेले भगवान परशुराम. लांब दाढी, वर बांधलेले केस, भगवे कपडे, हातात परशु, डोळ्यात आग असा विकीचा लूक समोर आला आहे. मॅडॉक फिल्म्स आणि विकी कौशलने सोशल मीडियावर फर्स्ट लूक शेअर केला आहे. 'महावतार' हे सिनेमाचं टायटलही घोषित करण्यात आलं आहे. धर्माचं रक्षण करणारा योद्धा चिरंजीवी परशुराम यांची कहाणी असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.


'महावतार' मधील विकी कौशलचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. 'फक्त विकीच या भूमिकेला न्याय देऊ शकतो' अशी कमेंट एकाने केली आहे. 'महावतार' पुढील वर्षी डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे. अमर कौशिकने सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. 

विकी कौशलचा 'छावा' सिनेमाही पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. यामध्ये तो छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारत आहे.  दिनेश विजाननेच सिनेमाची निर्मिती केली असून लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केले आहे. 

Web Title: Vicky Kaushal will play the role of Lord Parashuram in the movie title Mahavatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.