'मनमर्जियां'मधील विकी कौशलच्या हेअर स्टाईलची वाढती क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 06:00 IST2018-08-31T14:42:55+5:302018-09-01T06:00:00+5:30
अभिनेता विकी कौशल 'मनमर्जियां' चित्रपटात विकी नामक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेतून त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.

'मनमर्जियां'मधील विकी कौशलच्या हेअर स्टाईलची वाढती क्रेझ
अभिनेता विकी कौशलने विविध भूमिका साकारून कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. विकी 'मनमर्जियां' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याने यात विकी नामक भूमिका केली आहे. या भूमिकेतून विकीचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.
विकी कौशलने 'मनमर्जियां' चित्रपटात साकारलेली विकीची भूमिका त्याच्यापेक्षा खूपच भिन्न आहे. ही भूमिका साकारण्यासाठी विकीने या भूमिकेत स्वतःला सामावून घेतले. इतकेच नाही तर या रोलसाठी त्याने हटके हेअर स्टाईल केली. अशी हेअरस्टाईल त्याने यापू्र्वी कधी केली नव्हती. त्याने आपले केस कलर केलेत तेही एक कलर नाही तर बरेच. त्याचबरोबर केसात नक्षीदेखील काढली आहे. त्यामुळे त्याचा हेअरकट एकदम हटके झाला आहे. या हेअर स्टाईलमुळेच ट्रेलर व गाणी प्रदर्शित झाल्यावर विकी चर्चेत आला आहे. त्याची ही हेअरस्टाईल तरूणाईमध्ये हिट झाली आहे. ते सलूनमध्ये मनमर्जियांमधील विकीसारखी हेअर स्टाईल करण्याची डिमांड करत आहेत.
'मनमर्जियां' चित्रपटात विकी कौशलसह तापसी पन्नू व अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात तापसीने रूमी नावाच्या एका पंजाबी मुलीची भूमिका साकारली आहे. विक्की तिच्यावर जिवापाड प्रेम करतो. पण लग्न आणि जबाबदाऱ्या त्याला नको असतात. मग यात अभिषेकची एन्ट्री होते. रॉबी नावाच्या पंजाबी मुलाची भूमिका त्याने यात साकारली आहे. रूमीसोबत अरेंज मॅरेज करण्यासाठी रॉबी तयार असतो, यावर आधारीत हा चित्रपट आहे. येत्या २१ सप्टेंबरला 'मनमर्जियां' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विकी कौशलचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.