'छावा' गाजला आता पुढे काय? विकी कौशलच्या 'या' आगामी सिनेमांची सर्वांना उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 14:24 IST2025-02-17T14:11:40+5:302025-02-17T14:24:42+5:30

विकी कौशलची भूमिका असलेला 'छावा' सिनेमा चांगलाच गाजतोय. पण २०२५ मध्ये विकीच्या या आगामी सिनेमांचीही चांगलीच चर्चा आहे (chhaava movie)

Vicky Kaushal's upcoming movies in 2025 after chhaava movie released | 'छावा' गाजला आता पुढे काय? विकी कौशलच्या 'या' आगामी सिनेमांची सर्वांना उत्सुकता

'छावा' गाजला आता पुढे काय? विकी कौशलच्या 'या' आगामी सिनेमांची सर्वांना उत्सुकता

विकी कौशलचा 'छावा' (chhaava movie) सिनेमा चांगलाच गाजतोय. या सिनेमातील विकीने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक होतंय. 'छावा' सिनेमा चांगलाच गाजतोय. 'छावा' सिनेमाने तीन दिवसांमध्ये १०० कोटींच्या वर कमाई केलीय. 'छावा' सिनेमानंतर विकी कौशल (vicky kaushal) आगामी कोणत्या सिनेमात झळकणार याची सर्वांना उत्सुकता होती. जाणून घ्या विकीच्या आगामी सिनेमांविषयी सर्वकाही.

  • लव्ह अँड वॉर

'छावा'नंतर विकीच्या आगामी सिनेमा 'लव्ह अँड वॉर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात विकीसोबत रणबीर कपूर, आलिया भट हे कलाकार झळकणार आहेत. संजय लीला भन्सालींनी 'लव्ह अँड वॉर'चं दिग्दर्शन केलंय. मार्च २०२६ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यानिमित्ताने विकी कौशल पहिल्यांदाच संजय लीला भन्सालींसोबत काम करणार आहे.


  • महावतार

विकी कौशलच्या 'महावतार' सिनेमाची सध्या खूप उत्सुकता आहे. या सिनेमातील विकीचा पहिला लूक काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. विकी या लूकमध्ये अजिबात ओळखू येत नाहीये. विकी 'महावतार' सिनेमात भगवान परशुरामाची भूमिका साकारणार असल्याचं समजतंय. 'छावा'चे निर्माते दिनेश विजन यांनीच 'महावतार' सिनेमाची निर्मिती केली आहे. २०२६ च्या ख्रिसमसमध्ये 'महावतार'  सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अशाप्रकारे 'छावा'नंतर विकीच्या 'लव्ह अँड वॉर' आणि 'महावतार' या दोन सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हे दोन्ही सिनेमे पुढील वर्षी २०२६ ला रिलीज होणार आहेत. यावर्षी 'छावा'निमित्ताने विकीने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केलीय.

Web Title: Vicky Kaushal's upcoming movies in 2025 after chhaava movie released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.