बॉलिवूडच्या पडद्यावरून मैदानाच्या ‘हिरों’ची शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:13 AM2016-01-16T01:13:37+5:302016-02-07T12:07:39+5:30
बॉलिवूडच्या अभिनेत्रींना हँडसम क्रिकेटपटूंकडे नेहमी आकर्षण राहिले आहे. पार्टीजमध्ये अथवा शूटिंगदरम्यान या सौंदर्यतारकांच्या क्रिकेटपटूंसमवेत भेटी होतात. या भेटी पुढे ...
ब लिवूडच्या अभिनेत्रींना हँडसम क्रिकेटपटूंकडे नेहमी आकर्षण राहिले आहे. पार्टीजमध्ये अथवा शूटिंगदरम्यान या सौंदर्यतारकांच्या क्रिकेटपटूंसमवेत भेटी होतात. या भेटी पुढे वाढत जातात आणि एक दिवस थेट लग्नाच्या मंडपापर्यंत पोहचतात. हरभजनसिंग- गीता बसराचे तसेच झाले. युवराज सिंग- हॅजलही . अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मुहूर्त शोधत आहेत. नायिकांच्या गुगलीने क्रिकेटर आऊट होण्याची ही परंपरा तशी जुनीच आहे. बदलत्या काळाप्रमाणे त्यात नवीन नावे जुळत असतात इतकाच काय तो बदल.. गीताने भज्जी तर हॅजलने युवीची घेतली विकेट. मोहम्मद अझहरुद्दीन - संगीता बिजलानी
हे दोघे एकमेकांना भेटले त्यावेळी अझहरचे लग्न झाले होते आणि त्याला दोन मुले होती. अझहर त्याच्या कारकिर्दीत सर्वोच्च ठिकाणी होता. संगीता बिजलानीही यशस्वी अभिनेत्री होती. संगीतासाठी अझहरने आपल्या पत्नीला तलाक दिला आणि संगीतासोबत लग्न केले. १४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २0१0 साली दोघे विभक्त झाले. इम्रान खान-जीनत अमान
इम्रान खान म्हणजे क्रिकेटचा प्ले बॉय. जीनत अमान म्हणजे बॉलिवूडची बॉम्बशेल. दोघेही एकमेकांसाठी परफेक्ट होते. डेटिंगदरम्यान दोघेही बर्याच ठिकाणी एकत्र फिरताना दिसून यायचे, मात्र ही कहानीही अधुरीच राहिली आणि लवकरच दोघेही वेगळे झाले.
रवी शास्त्री - अमृता सिंग
१९८५ साली ऑस्ट्रेलियात ऑडी जिंकल्यानंतर रवी शास्त्री एका रात्रीत स्टार झाला. त्यावेळी अमृता ही ख्यातनाम अभिनेत्री होती. पुढे केव्हातरी ते एकत्र भेटले. या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा चालल्या. परंतु हे नातेही दीर्घकाळ टिकले नाही. मन्सूर अली खान पतौडी-शर्मिला टागोर
स्व. मन्सूर अली खान पतौडी हे बॉलिवूड 'दिवा' शर्मिला टागोर यांना १९६५ साली या दोघांच्या कॉमन मित्राच्या पार्टीत भेटले. 'लव्ह अँट फस्र्ट साईट' असंच काही घडलं. शर्मिला या त्याकाळी नावाजलेल्या अभिनेत्री होत्या आणि टायगर पतौडी हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. या दोघांच्या घरातून विरोध असतानाही दोघे विवाहबंधनात अडकले. हे प्रेमप्रकरण आपल्या देशात खूप गाजले होते.
अंजू महेंद्रू-सर गॅरी सोबर्स
वेस्ट इंडीजचा संघ १९६७ साली भारतीय दौर्यावर आला होता. अंजू महेंद्रू आणि सर गॅरी सोबर्स अचानक भेटले अन् एकमेकांच्या प्रेमातही पडले. त्यांनी वाजत-गाजत साखरपुडाही केला. पण, काही काळानंतर काय झाले कुणास ठाऊक त्यांच्यातील संबंध संपुष्टात आले.