OMG 2 निळं धोतर, केसांच्या जटा, गळ्यात माळ...व्हायरल झाला Akshay Kumarचा 'शिव' अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 18:15 IST2021-12-17T18:14:43+5:302021-12-17T18:15:17+5:30
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या आगामी सिनेमा 'ओएमजी २' (OMG 2)चे शूटिंग करतो आहे.

OMG 2 निळं धोतर, केसांच्या जटा, गळ्यात माळ...व्हायरल झाला Akshay Kumarचा 'शिव' अवतार
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या आगामी सिनेमा 'ओएमजी २' (OMG 2)चे शूटिंग करतो आहे. अक्षय कुमार सिनेइंडस्ट्रीतील त्या अभिनेत्यांपैकी एक आहे जो वर्षांतून ३ ते ४ चित्रपटाचे शूटिंग करत असते. त्याच्याबद्दल सर्वांनाच माहित आहे की अक्षय कुमार चित्रपटाच्या शूटिंगसाठी जास्त वेळ घेत नाही आणि नॉन स्टॉप काम करते आहे. सध्या अक्षय 'ओएमजी २' (OMG 2)च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान चित्रपटाच्या सेटवरील अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओत अक्षय कुमारचा लूक पाहून चाहते चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अक्षय कुमारच्या इंस्टाग्रामवरील फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार फुल स्टाइलमध्ये वॉक करताना दिसत आहे. त्याने ब्लू रंगाची डेनिम केप्री घातली आहे आणि त्यासोबतच क्रिम रंगाचा लाँग स्वेटर घातला आहे. मात्र त्याच्या हेअर स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत त्याचे लांब केस पाहायला मिळत आहे आणि पोनी टेल बांधला आहे. त्याचा हा लूक कुल वाटतो आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अक्षय कुमारचा चित्रपट बेल बॉटम आणि सूर्यवंशी नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसेच त्याचा आगामी चित्रपट 'अतरंगी रे' लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत सारा अली खान आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे.