तो मी नव्हेच...! धुलाईच्या ‘त्या’ व्हिडीओवर खुद्द अजय देवगणने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 10:13 AM2021-03-30T10:13:39+5:302021-03-30T10:15:40+5:30

ट्विटरवर एका युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये मारामारी करणारा व्यक्ती अजय देवगणसारखा दिसतोय असा दावा त्याने केला होता.

video of alleged beating viral actor ajay devgan reacted said this | तो मी नव्हेच...! धुलाईच्या ‘त्या’ व्हिडीओवर खुद्द अजय देवगणने केला खुलासा

तो मी नव्हेच...! धुलाईच्या ‘त्या’ व्हिडीओवर खुद्द अजय देवगणने केला खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देएका युजरने संबंधित व्हिडीओ शेअर केला आहे. यात पांढ-या रंगाची शर्ट घातलेल्या व्यक्तिची धुलाई होताना दिसतेय.

राजधानी दिल्लीत  दोन गटांत झालेल्या भांडणाचा व्हिडीओत ज्या व्यक्तिला चोप देण्यात येतोय, तो सुपरस्टार अजय देवगण असल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडिया युजर्सच्या दाव्यानुसार, घटनेच्या वेळी अजय देवगण दारूच्या नशेत तर्र होता. कार पार्किंगवरून वाद सुरु झाला आणि बघता बघता हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. अर्थात व्हिडीओ अजय देवगणचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. आता हा व्हिडीओ पूर्णपणे फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजयच्या टीमने तसा खुलासा केला आहे. अजयनेही  ट्वीट करून तो मी नव्हेच, असे स्पष्ट केले आहे.

अजयचे ट्वीट

कदाचित माझा कोणी कार्बन कॉपी अडचणीत सापडला आहे. मला याबाबत सतत कॉल येत आहेत. मी दिल्लीला गेलोच नव्हता. माझा कोणाशी वाद झाल्याची बातमी खोटी आहे, असे अजयने ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे.

टीमचा खुलासा
त्याआधी व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती अजय देवगण नसल्याचे त्याच्या टीमने स्पष्ट केले आहे. गेल्या 12 महिन्यांत अजय एकदाही दिल्लीला गेला नाही. ‘तान्हाजी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो  शेवटचा दिल्लीत गेला होता. त्यामुळे व्हिडीओत तो आहे, हा दावा खोटा आहे. दिल्लीत घडलेल्या घटनेचा अजयशी काहीही संबंध नाही. त्या व्हिडीओमध्ये दिसणा-या कुठल्याही व्यक्तीला अजय ओळखत नाही. त्याचे नाव वापरुन कुठल्याही अफवा पसरवू नये.  याऊपरही कोणी अजयचे नाव वापरुन खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात अधिकृत तक्रार केली जाईल, असे टीमने म्हटले आहे.

एका युजरने संबंधित व्हिडीओ शेअर केला आहे. यात पांढ-या रंगाची शर्ट घातलेल्या व्यक्तिची धुलाई होताना दिसतेय. ‘हा अजय देवगण आहे की नाही, माहित नाही. पण लोकांमध्ये शेतकरी आंदोलनाचा राग पसरताना दिसतोय,’ असे या युजरने म्हटले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या प्रकरणामुळे अजयला ट्रोल देखील करण्यात आले होते.  

Web Title: video of alleged beating viral actor ajay devgan reacted said this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.