Video: करण जोहरने विचारला प्रश्न; मलायका अरोरा म्हणाली, ‘इस सवाल को सवाल ही रहने दीजिए’!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 08:16 AM2018-10-25T08:16:50+5:302018-10-25T08:19:38+5:30
मलायका ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या सेटवर पोहोचली आणि करण जोहरने अप्रत्यक्षपणे अर्जुनवरून मलायकाला चिडवणे सुरू केले.
बॉलिवूडमध्ये सध्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्याच अफेअरची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर आपल्या ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोमध्ये गेला होता. या शोमध्ये मलायका जज आहे. मलायकासोबतच अर्जुनची एक वेगळीच केमिस्ट्री या शोमध्ये पाहायला मिळाली. या सेटवर दोघेही हातात हात घालून दिसले. केवळ इतकेच नाही तर दोघांनी एकत्र डान्सही केला. गत २३ आॅक्टोबरला मलायकाचा वाढदिवस होता. हा वाढदिवसही मलायकाने अर्जुनसोबत साजरा केला. खास वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्जुन कपूर व मलायका युरोपला गेले होते. सेलिब्रेशन करून परतल्यानंतर दोघांनाही मुंबई विमानतळावर एकत्र पाहिले गेले. मुंबईवर परतल्यावर मलायका ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या सेटवर पोहोचली आणि करण जोहरने अप्रत्यक्षपणे अर्जुनवरून मलायकाला चिडवणे सुरू केले.
करणने हा व्हिडिओ आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओत करणने सर्वातआधी मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि यानंतर हळूच मलायकाची मजा घेतोय. ‘हॅपी बर्थ डे मलायका,तू आत्ताच युरोपवरून परतली़ तू तिथे काय केले? तुझी ट्रिप कशी राहिली? या ट्रिपवर तू काय एकटी गेली होतीस?’ असे करण मलायकाला विचारतोय. यावर मलायकाही काहीशा मस्तीमूडमध्ये उत्तर देतेय. ‘सवाल को सवाल ही रहने दीजिए,’ असे ती म्हणतेय.
मलायका व अरबाज खान यांचा घटस्फोट होण्याआधीपासून मलायका व अर्जुनच्या कथित अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत. मलायका व अर्जुनची वाढती जवळीक या घटस्फोटाला कारणीभूत ठरली, अशीच त्यावेळी चर्चा होती. ही बातमी सगळ्यांसाठीच शॉकिंग होती. कारण अर्जुन कपूरचे कुटुंब आणि सलमानचे कुटुंब यांच्यात घनिष्ट संबंध होते. शिवाय अर्जुन कपूर सलमानची बहीण अर्पिता हिला अनेक वर्ष डेट करत होता. अर्थात अर्जुन वा मलायका अद्यापही यावर काहीही बोलले नाहीत. पण लॅक्मे फॅशन वीक2018 दरम्यान मलायका व अर्जुन एकत्र दिसले आणि नव्याने चर्चेला सुरूवात झाली.