Video: "गदर २" च्या स्पेशल स्क्रिनींगसाठी नानांचं वेलकम; सनीसोबतची घट्ट मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 01:52 PM2023-08-12T13:52:39+5:302023-08-12T14:12:59+5:30

गदर २ सिनेमाचे स्पेशल स्क्रिनींग या आठवड्यात पार पडले. या स्क्रिनींगसाठी सनी देओल तारासिंगच्या अवतारात पोहोचला होता

Video: Nana's welcome for the special screening of 'Gadar 2'; Sunny Deol and Nana Patekar's friendship is seen | Video: "गदर २" च्या स्पेशल स्क्रिनींगसाठी नानांचं वेलकम; सनीसोबतची घट्ट मैत्री

Video: "गदर २" च्या स्पेशल स्क्रिनींगसाठी नानांचं वेलकम; सनीसोबतची घट्ट मैत्री

googlenewsNext

मुंबई - बॉलिवूड मेगास्टार सनी देओलचा गदर २ चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने ४० कोटींचा गल्ला जमवला आहे. गदर चित्रपटाची पार्श्वभूमी असल्याने सनी देओल आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील जंग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात हाऊसफुल्ल गर्दी केली आहे. या चित्रपटात सनी देओलसह अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. तर, मराठमोळ्या नाना पाटेकरने आवाज दिला आहे. चित्रपटाच्या सुरुवातील फ्लॅशबॅकसाठी नाना आवाज थेअटरमध्ये घुमतो. 

गदर २ सिनेमाचे स्पेशल स्क्रिनींग या आठवड्यात पार पडले. या स्क्रिनींगसाठी सनी देओल तारासिंगच्या अवतारात पोहोचला होता. या स्क्रिनींगसाठी अनेक बॉलिवूड सितारे एकत्र आले होते. त्यात, नाना पाटेकर यांचीही एंट्री पाहायला मिळाली. रेड कार्पेटवर सनी आणि नानाच्या मैत्रीचा एक व्हिडिओच समोर आला आहे. सनीने नानाचे वेलकम केले अन् नानानेही सनीच्या गालावरुन हात फिरवत दोघांमधील घट्ट मैत्री सर्वांना दाखवून दिली. यावेळी, सनीच्या सांगण्यावरुन नाना पाटेकरांनी आपला हात उंचावत शोले-डोलेही दाखवले. 

गदर २ चित्रपटात नाना पाटेकर हे नॅरेटर म्हणून जोडले गेले आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला नानांचा आवाज चाहत्यांना ऐकायला मिळतो. यापूर्वीच्या गदर चित्रपटात ओम पुरींचा आवाज ऐकायला मिळाला होता. आता, ती जागा नानाने घेतली आहे. त्यामुळेच, नानाचाही गदर २ चित्रपटात सहभाग आहे. या सहभागामुळे आणि सनीसोबत असलेल्या मैत्रीमुळे नाना पाटेकर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनींगला हजर होते. विशेष म्हणजे नाना बहुदा चित्रपटाच्या स्क्रिनींगला उपस्थित राहत नाहीत. 

दरम्यान, यावेळी, कुर्ता आणि पायजमा घालून आलेल्या नानांचे सनी देओलने रेड कार्पेटवर वेलकम केलं. त्यावेळी, दोघांनीही एकमेकांना जादू की झप्पी देत गदर २ साठी शुभेच्छाही दिल्या. इंस्टाग्रामवरुन हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, दोन्ही दिग्गज कलाकारांचा साधेपणाही सर्वांना दिसून येतोय. 

राष्ट्रपती भवनमध्ये होणार स्पेशल स्क्रिनींग

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ ने पहिल्या वीकेंडला चांगली कमाई करत असून १५ ऑगस्टच्या निमित्ताने देशभरातही देशभक्तीचा फिव्हर आहे, तसेच, जोडून सुट्ट्या आल्याने चित्रपटगृह हाऊसफुल्ल होत आहेत. विशेष म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींनीही चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आज तकशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. आम्ही काल बसलो होतो, तेव्हा सेन्सॉर बोर्डातून आम्हाला फोन आला. त्यावेळी, तिकडून सांगण्यात आलं की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गदर २ चित्रपट पाहू इच्छित आहेत. त्यानंतर, त्यांनी आम्हाला ई-मेलही केला. त्यामुळे, आम्ही सर्वजण खूपच खुश आहोत, आनंदाने नाचू लागलो. कारण, गदर २ चित्रपटाला एवढा मोठा सन्मान मिळत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, असे अनिल शर्मा यांनी म्हटलं.

Web Title: Video: Nana's welcome for the special screening of 'Gadar 2'; Sunny Deol and Nana Patekar's friendship is seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.