Video : 'जय भीम' चित्रपटातील सीनवरुन प्रकाश राज ट्रोल, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:10 PM2021-11-02T17:10:18+5:302021-11-02T17:13:58+5:30
अभिनेता प्रकाश राज आणि सूर्या यांची स्टारकास्ट असलेला जय भीम चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट सोशल मीडियासह माध्यमांत चांगलाच चर्चेत आहे.
मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता आणि बॉलिवूडचा जयकांत शिक्रे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ट्विटरवर अभिनेता प्रकाश राज ट्रेंड करत असून त्यांच्या जयभीम चित्रपटातील एका सीनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, हिंदीत संवाद साधल्यामुळे एका तमिळ व्यकीच्या ते कानशिलात वाजवतात. त्यांच्या या सीनवरुन अनेकजण त्यांच्यावर नाराज झाले आहेत. तर, अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केलीय.
अभिनेता प्रकाश राज आणि सूर्या यांची स्टारकास्ट असलेला जय भीम चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट सोशल मीडियासह माध्यमांत चांगलाच चर्चेत आहे. टीएस. गगानवेल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आदिवासी लोकांवर होणाऱ्या अन्यायाची कथा या चित्रपटातून साकारण्यात आली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून तमिळ भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील एका सीनवर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यामध्ये, अभिनेता प्रकाश राज हे एका व्यक्तीच्या कानशिलात लगावतात. त्यावेळी, मला का मारले, अशी विचारणा संबंधित व्यक्तीकडून करण्यात येते. त्यावर, बोलताना तू हिंदीत का बोललास, तमिळ भाषेत बोल म्हणून प्रकाश राज यांच्या भूमिकेतील व्यक्तीकडून सज्जड दमच दिला जातो. सध्या हा सीन चांगलाच व्हायरल होत आहे.
This same #prakashraj contested in MAA elections in Telugu states saying no one is outsider. @NagaBabuOffl this is the reason people hated Prakashraj. https://t.co/ACiexB3ScR
— AK (@kumar_ak) November 2, 2021
प्रकाश राज हे नेहमीच आपला प्रोफोगांडा चालवतात, ते आपल्या विचासरणीला चित्रपटांच्या माध्यमातून प्रदर्शित करतात, असा आरोप करत अनेकांनी प्रकाश राज यांना ट्रोल केलंय. ट्विटरवर त्यांच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
#JaiBhim … I’m immensely proud to be a part of this honest film .. 🙏🏻@Suriya_offl#Jyotika for believing in this film @tjgnan#kruthika really proud of you both 👍👍@rajsekarpandian@RSeanRoldan@srkathiir@KKadhirr_artdir@philoedit@rajisha_vijayan#Manikandan@jose_lijomolpic.twitter.com/IfEzqMUNBi— Prakash Raj (@prakashraaj) November 2, 2021