VIDEO: 'सत्यमेव जयते', सुशांत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने तोडली चुप्पी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 12:00 PM2020-08-01T12:00:24+5:302020-08-01T12:00:51+5:30
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रियाच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच तिने मौन सोडले आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला दीड महिना उलटलेला असतानाही अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. त्यात सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात पटना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर एकानंतर एक मोठे खुलासे होताना दिसत आहे. दरम्यान या सगळ्यावर रियाने पहिल्यांदाच चुप्पी सोडली आहे.
रिया चक्रवर्ती म्हणाली, 'माझा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय नक्कीच मिळेल. इलेक्ट्रॉनिक मीडियात माझ्याबद्दल अनेक विचित्र गोष्टी बोलल्या जात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. सत्याचा विजय होईल. सत्यमेव जयते.' रियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH: Rhea Chakraborty releases video on #SushantSinghRajputDeathCase.
— ANI (@ANI) July 31, 2020
She says, "I've immense faith in God & the judiciary. I believe that I'll get justice...Satyameva Jayate. The truth shall prevail." pic.twitter.com/Fq1pNM5uaP
रिया चक्रवर्तीने तिच्या विरोधात पाटणामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आक्षेप घेतला आहे. ही तक्रार वैध नाही असे तिचे म्हणणे आहे. पाटण्याच्या राजीव नगर या परिसरात सुशांतच्या वडिलांचा प्रभाव आहे आणि बिहार पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्षापातीपणे तपास होणार नाही अशी याचिका रियाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
इतकेच नाही तर बिहार पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास देणे योग्य नसून मुंबई पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास करावा असाही उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे.