Video : रवि किशनसोबतच्या 'त्या' इंटीमेट सीनबद्दल सोनाली बिनधास्तपणे बोलली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 11:12 AM2021-12-19T11:12:13+5:302021-12-19T11:12:28+5:30
‘whistleblower' या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी यी सिरीजची स्टारकास्ट द कपिल शर्मा शोमध्ये आली होती. त्यावेळी, वेबसिरीजसाठी कास्टींग आणि इंटीमेट सीनबाबतचा एक किस्सा सोनालीने शेअर केला.
मुंबई - मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आपल्या प्रखर अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटातील तिच्या कामाचं चाहत्यांकडून नेहमीच कौतुक होते. आता, सोनालीने वेबसिरीजच्या माध्यमातूनही चित्रपटसृष्टीत एंट्री केली आहे. विसलब्लोअर या वेबसिरीजमध्ये सोनाली, भाजपुरी स्टार आणि खासदार रविकिशनसोबत झळकली आहे. या सिरीजमध्ये रविकिशन, सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. सोनालीने या बेवसिरीजमधील इंटीमेट सीनबद्दल द कपिल शर्मा शोमध्ये किस्सा शेअर केला आहे.
‘whistleblower' या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी यी सिरीजची स्टारकास्ट द कपिल शर्मा शोमध्ये आली होती. त्यावेळी, वेबसिरीजसाठी कास्टींग आणि इंटीमेट सीनबाबतचा एक किस्सा सोनालीने शेअर केला. सोनालीने बिनधास्तपणे पलंग तोड दो... असे म्हणत या सीनबद्दल सांगतिले. त्यावेळी, रवि किशनही लाजला होता. सोनालीने वेबसिरीजमध्ये रविकिशन यांच्या पत्नीची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच, सीरजमध्ये दोघांचेही रोमॅन्टीक सीन आहेत. याबाबतच शोमध्ये जाहीरपणे चर्चा झाली.
सोनालीने वेल डन अब्बामध्ये झालेल्या सीनबाबत माहिती दिली. मला रविसोबत काम करण्याची संधी मिळत होती. श्यामबाबू यांनी मला विचारलं, एक रोल आहे, करणार का?, मी म्हटलं हो करेल. तू पत्नी आहे, आणि रवि किशन तुझा पती. मी म्हटलं अतिशय छान. त्यानंतर, दिग्दर्शकाने सांगितले की, तुला रविच्या अंगावर पडायचं आहे, पलंग तोड दो... हा सीन करताना मला लाज वाटत होती, पण समोर रवि किशन असल्याने मला मजाही आली, असा किस्सा सोनालीने सांगितला. त्यावेळी, रवि किशनने अरे बाप रे.. म्हणत लाजाळूपणा दाखवला. तर, सोनालीनेही नंतर मान खाली केली होती. इंस्टाग्रावरुन हा व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.