Video: ​टायगर श्रॉफला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी चाहत्याने घेतली १३ फूटावरून उडी! मग झाले असे काही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 06:32 AM2017-11-28T06:32:16+5:302017-11-28T12:10:11+5:30

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला आपण अनेकदा अ‍ॅक्शन करताना पाहिले आहे. पण चाहत्यांना मात्र तो कायम, या अ‍ॅक्शन सीन्सचे अनुकरण ...

Video: Tiger Shrofel wants to 'Impress' 13 jump on foot! Then something happened !! | Video: ​टायगर श्रॉफला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी चाहत्याने घेतली १३ फूटावरून उडी! मग झाले असे काही!!

Video: ​टायगर श्रॉफला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी चाहत्याने घेतली १३ फूटावरून उडी! मग झाले असे काही!!

googlenewsNext
लिवूड अभिनेता टायगर श्रॉफला आपण अनेकदा अ‍ॅक्शन करताना पाहिले आहे. पण चाहत्यांना मात्र तो कायम, या अ‍ॅक्शन सीन्सचे अनुकरण न करण्याचे बजावत असतो. कारण पडद्यावरचे सगळे अ‍ॅक्शन सीन्स एक्सपर्टच्या देखरेखीखाली केले जातात. त्यामुळेच अलीकडे एका चाहत्याचा स्टंट पाहून टायगर नाराज झाला. अमन टागेरियन नावाच्या या चाहत्याने आपल्या tweeter हँडलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात अमन एक स्टंट करताना दिसतोय. ‘उंचीवरून उडी मारायला मी घाबरायचो. या भीतीवर मी आज विजय मिळवला. मी मनाशी ठरवले आणि मी सुपरहिरो आहे, ही कल्पना केली. यामुळे माझ्यासाठी स्टंट करणे सोपे झाले.’ असे त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलेय. शिवाय हा स्टंट करण्याची प्रेरणा दिल्याबद्दल टायगर श्रॉफचे आभारही मानलेत. या व्हिडिओमध्ये हा चाहता १३ फूट उंचीवरून उडी घेताना दिसतोय.  

चाहत्याचा स्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.



खरे तर आपला व्हिडिओ पाहून टायगर आपल्याला शाब्बासकी देईल, प्रशंसा करेल, असे या चाहत्याला वाटले होते. पण झाले भलतेच. हा व्हिडिओ पाहून या चाहत्याला शाब्बासकी देण्याऐवजी टायगर नाराज झाला. ‘माफ कर, पण असा स्टंट करणे मूर्खपणा आहे. कधीही स्वत:चे आयुष्य धोक्यात घालू नकोस. पडद्यावरचे अ‍ॅक्शन सीन्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होतात. चित्रपट पाहून स्वत: असे स्टंट करण्याचा प्रयत्न करू नकोस,’ असे टायगरने या चाहत्याला सुनावले.   रिअल लाईफ आणि रिल लाईफमध्ये खूप फरक असतो. मित्रांच्या व कुणाच्याही म्हणण्यावर पडद्यावरच्या अ‍ॅक्शन हिरोचे स्टंट करू नका, असे टायगरने याआधीही सांगितले आहे. 

ALSO READ : गर्लफ्रेंडचा फोटो काढल्याने संतापला टायगर श्रॉफ !

टायगर असा पोटतिडकीने सांगतो म्हटल्यावर कुण्याही चाहत्याला त्याचे म्हणणे पटेल. या चाहत्याबद्दलही हेच झाले. त्याने टायगरची माफी मागत, मी पुन्हा अशी जोखीम कधीही घेणार नाही, असे वचन टायगरला दिले. मी तुला दुखावले. मी मनापासून तुझी माफी मागतो. तुझे शब्द मी कायम स्मरणात ठेवील, अशी आर्जवही या चाहत्याने केली. एकंदर काय तर टायगरचा सल्ला कामी आला.

Web Title: Video: Tiger Shrofel wants to 'Impress' 13 jump on foot! Then something happened !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.