Video Viral : अरबाज खानने सर्वांसमोर जोडले हात! म्हणे, आता आणखी सट्टा नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 02:33 PM2019-04-10T14:33:40+5:302019-04-10T14:35:18+5:30
गतवर्षी आयपीएल सट्टा प्रकरणात अरबाज खानचे नाव समोर आले होते. अरबाजने खुद्द आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याची शिवाय गत पाच वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची कबुली दिली होती. आता एक वर्षानंतर अरबाज पुन्हा एकदा आयपीएल सट्टा प्रकरणावर बोलला.
गतवर्षी आयपीएल सट्टा प्रकरणात अरबाज खानचे नाव समोर आले होते. अरबाजने खुद्द आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याची शिवाय गत पाच वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची कबुली दिली होती. आता एक वर्षानंतर अरबाज पुन्हा एकदा आयपीएल सट्टा प्रकरणावर बोलला. तूर्तास अरबाज ‘पिंच’ हा युट्यूब चॅनलवरील चॅट शो होस्ट करतोय. या चॅट शेमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी येतात आणि सोशल मीडियावरचे कमेंट्स आणि ट्रोलर्सच्या प्रश्नांना उत्तरे देतात. ‘पिंच’च्या ताज्या एपिसोडमध्ये अभिनेता वरूण धवनने हजेरी लावली. शोच्या अखेरिस वरूणने अरबाजबद्दल युजर्सनी केलेल्या कमेंट्स वाचून दाखवल्या. यातील एका कमेंटमध्ये सट्टा प्रकरणावरून अरबाजला लक्ष्य करण्यात आले होते.
‘थोडा सोचो, थोडा समझो, फिर बुकी चुनो अरबाज सर,’ असे एका युजरने लिहिले होते. या कमेंटला उत्तर देण्याची पाळी अरबाजची होती. तो यावर काय उत्तर देतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच, ‘हे सगळे मी बंद केले आहे,’ असे अरबाज म्हणाला. ‘बिल्कुल सही कहा. नो मोर बुकी, नो मोर गॅम्बलिंग. बस बंद कर दिया. अभी मजे से आयपीएल टीव्ही पर देखता हूं और एन्जॉय करता हूं,’ असे त्याने सांगितले.आता अरबाजच्या या उत्तरावर किती विश्वास ठेवायचा, हा निर्णय तुमचा आहे.
आयपीएल सट्टा प्रकरणात अरबाजचे नाव येताच खळबळ माजली होती. ठाणे पोलिसांनी अरबाजला नोटीस बजावली होती. तूर्तास अरबाज ‘दबंग 3’ या चित्रपटात बिझी आहे. सलमान खान व सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत.