१७ वर्षांनंतर विद्या बालन पुन्हा बनली मंजुलिका, 'भूलभुलैया ३'ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर अभिनेत्रीने दिली ही रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 15:43 IST2024-10-11T15:42:40+5:302024-10-11T15:43:26+5:30
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aryan)चा आगामी चित्रपट 'भूलभुलैया ३'(Bhool Bhulaiya 3)चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून तब्बल १७ वर्षांनंतर विद्या बालन (Vidya Balan) पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

१७ वर्षांनंतर विद्या बालन पुन्हा बनली मंजुलिका, 'भूलभुलैया ३'ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर अभिनेत्रीने दिली ही रिअॅक्शन
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aryan)चा आगामी चित्रपट 'भूलभुलैया ३'(Bhool Bhulaiya 3)चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून तब्बल १७ वर्षांनंतर विद्या बालन (Vidya Balan) पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मंजुलिकाची ही झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. विद्याने भूलभुलैया फ्रंचाइजीच्या पहिल्या सिनेमात मंजुलिकाची भूमिका साकारली होती. अलिकडेच दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी सांगितले की, भूलभुलैया ३मध्ये एंट्री कशी झाली आणि स्क्रीप्ट ऐकल्यानंतर तिची काय प्रतिक्रिया होती.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अनीस बज्मी यांनी सांगितले की, त्यांना नेहमीच असे वाटत होते की, या भूमिकेसाठी विद्याच योग्य निवड आहे. दिग्दर्शक म्हणाला की, मला नेहमीच वाटत होते की, जर मंजुलिकाची भूमिका कोणी साकारू शकते तर ती विद्या बालन आहे. तिने पहिल्या सिनेमात दमदार काम केले होते आणि तिच्या परफॉर्मन्सचे खूप कौतुक झाले होते.
विद्या बालनला आवडली स्क्रिप्ट
अनीस बज्मी यांनी सांगितले की, त्यांनी 'भूलभुलैया ३'साठी विद्या बालनशी संपर्क साधला होता आणि सुदैवाने तिला स्क्रिप्ट खूप आवडली होती. जेव्हा स्क्रीप्ट वाचन झाले तेव्हा मी १० मिनिटांचे कथन दिले आणि मला जाणून घ्यायचे होते की तिला काय वाटते? मी तिला सांगितल्यावर ती खूप उत्सुक झाली आणि म्हणाली की खूप मजा येईल.
विद्या बालनचे १७ वर्षांनी कमबॅक
चित्रपट निर्माते अनीस बज्मी यांनी सांगितले की ते १० ते १५ दिवसांनंतर पुन्हा विद्या बालनला भेटले आणि तिला संपूर्ण कथा सांगितली, परंतु पहिल्या १० मिनिटांतच विद्याने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. अनीस बज्मी यांनी सांगितले की, 'भूल भुलैया ३'मधून ती १७ वर्षांनंतर परतते आहे, यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. तिने चित्रपटात सुंदर काम केले आहे.
'भूलभुलैया ३' दिवाळीला होणार रिलीज
२००७ मध्ये 'भूलभुलैया' या फ्रेंचाइजीचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये विद्या बालनने मंजुलिकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. १७ वर्षांनंतर विद्या बालन 'भूलभुलैया ३'मध्ये मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.