प्रेमात सरप्राईज मिळणार की गोंधळ वाढणार? विद्या बालनच्या 'दो और दो प्यार'चा हटके टिझर पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 14:56 IST2024-03-21T14:45:52+5:302024-03-21T14:56:05+5:30
विद्या बालन-प्रतीक गांधीची भन्नाट केमिस्ट्री असलेल्या 'दो और दो प्यार'चा टिझर एकदा पाहाच

प्रेमात सरप्राईज मिळणार की गोंधळ वाढणार? विद्या बालनच्या 'दो और दो प्यार'चा हटके टिझर पाहाच
गेल्या अनेक दिवसांपासून विद्या बालनच्या आगामी 'दो और दो प्यार' सिनेमाची उत्सुकता होती. विद्या बालन यानिमित्ताने खुप दिवसांनी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर 'स्कॅम' फेम प्रतीक गांधी, इलियाना डीक्रूज या कलाकारांची वेगळीच केमिस्ट्री पाहायला सगळेच उत्सुक आहेत. अखेर नुकतंच 'दो और दो प्यार' सिनेमाचा टिझर भेटीला आलाय.
टिझरमध्ये पाहायला मिळतंय की, प्रतीक गांधी आणि विद्या बालन दोघेही नवरा-बायको असतात. परंतु दोघांंचं वैवाहीक जीवन इतकं काही सुखात नसतं. पुढे दोघांनाही बाहेर एका वेगळ्याच व्यक्तीसोबत प्रेम होतं. अशाप्रकारे विवाहबाह्य संबंधात उडणाऱ्या गोंधळावर 'दो और दो प्यार' मध्ये विनोदीरित्या भाष्य केलेलं दिसतंय. विद्या बालनचा हॉट अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
'दो और दो प्यार'च्या टिझरमध्ये बोल्ड संवाद, भावनिक आणि रोमँटिक प्रसंग पाहायला मिळतात. Applause Entertainment आणि Ellipsis Entertainment production यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केलीय. विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डीक्रूज आणि सेंधिल राममूर्थी या कलाकारांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. १९ एप्रिल २०२४ ला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.