विद्या बालनला भाऊ कदमची भुरळ, बनवला भन्नाट व्हिडिओ; तुम्ही पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 15:56 IST2023-09-16T15:55:46+5:302023-09-16T15:56:04+5:30
अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या विद्या बालनला मात्र मराठमोळ्या भाऊ कदमची भुरळ पडली आहे.

विद्या बालनला भाऊ कदमची भुरळ, बनवला भन्नाट व्हिडिओ; तुम्ही पाहिलात का?
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन कायमच चर्चेत असते. ‘भुल भुलैय्या’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मिशन मंगल’, ‘परिणीता’, ‘बेगम जान’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘शंकुतला देवी’ अशा चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारून विद्या बालनने अभिनयाची छाप पाडली. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी विद्या बालन एक आहे. उत्तम अभिनय आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ती ओळखली जाते. विद्याला तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण, हार न मानता तिने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या विद्या बालनला मात्र मराठमोळ्या भाऊ कदमची भुरळ पडली आहे.
विद्या बालन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल ती चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देते. त्याबरोबरच अनेक मजेशीर रीलही विद्या शेअर करत असते. विद्याने शेअर केलेल्या अशाच एका रीलची चर्चा रंगली आहे. तिने लाल रंगाची साडी नेसून एका टिपिकल बाईचा लूक केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या रीलमध्ये विद्या भाऊ कदमच्या आवाजातील डायलॉग बोलत आहे. “सिगरेट ओढता का? दारू पिता? सुपारी? काहीच नाही हिला व्यसन...सगळं नाही नाही म्हणता...मी काय मागणारे तुमच्याकडे हा म्हटल्यावर...एकतरी व्यसन पाहिजे. पथ्य काय सांगू तुला मी...असा पोपट नाही करायचा डॉक्टरचा” हे भाऊ कदमच्या आवाजातील डायलॉग म्हणत विद्याने मजेशीर रील बनवला आहे.
...अन् भर कार्यक्रमात दीपिकाने शाहरुखला केलं किस; 'जवान'च्या सक्सेस पार्टीतील 'तो' व्हिडिओ व्हायरल
विद्या बालनच्या या रीलवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. हा रील व्हिडिओ चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडत आहे. विद्याच्या या व्हिडिओवर मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकनेही कमेंट केली आहे. मानसीने “हाहाहा” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. विद्या बालनचा हा रील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.