सारा अन् अनन्या पांडेनंतर कुणाला डेट करतोय कार्तिक आर्यन? विद्या बालनने केली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:19 IST2024-10-30T17:18:32+5:302024-10-30T17:19:27+5:30
कार्तिक आर्यन लवकरच 'भूल भुलैया 3' या चित्रपटात दिसणार आहे.

सारा अन् अनन्या पांडेनंतर कुणाला डेट करतोय कार्तिक आर्यन? विद्या बालनने केली पोलखोल
Vidya Balan on Kartik Aaryan’s Relationship : अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच 'भूल भुलैया 3' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'भूल भुलैया 3' सिनेमाची अजय देवगण आणि अक्षय कुमार स्टारर 'सिंघम अगेन' या चित्रपटाशी टक्कर होणार आहे. 'भूल भुलैया 3' या चित्रपटात कार्तिक आर्यन पुन्हा रूह बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर विद्या बालन 17 वर्षानंतर मंजुलिकाच्या भूमिकेत परतत आहे.
'भूल भुलैया 3' या हॉरर कॉमेडी चित्रपटात जरी रूह बाबा आणि मंजुलिका एकमेकांचे घट्ट शत्रू असले, तरी खऱ्या आयुष्यात कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विद्या-कार्तिकचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता अलीकडेच विद्या बालनने कार्तिक आर्यनच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला.
कार्तिक आर्यन आणि विद्या बालन लवकरच 'भूल भुलैया 3' च्या प्रमोशनसाठी द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. कपिलच्या शोमधील दोघांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 'मंजुलिका' उर्फ विद्या बालन कार्तिकच्या आयुष्यात एक मिस्ट्री गर्ल असल्याचे संकेत दिलेत.
विद्या म्हणाली, "सेटवर तो नेहमी फोनवर असायचा, लव्ह यू....मी टू.. लव्ह यू... मी टू असं बोलायचा". पण, विद्याने तो कुणाशी बोलायचा, तिचे नाव काय याचा खुलासा केला नाही. तर यावेळी कार्तिक लाजताना पाहायला मिळाला. कार्तिक आर्यन त्याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल जेवढा चर्चेत असतो, तेवढीच त्याच्या लव्ह लाईफचीही चर्चा होते. कार्तिकने आतापर्यंत जान्हवी कपूरपासून सारा अली खान आणि अनन्या पांडेपर्यंत सर्वांना डेट केले आहे. सारा अली खानसोबत झाल्यानंतर कार्तिक तो सिंगल असल्याचे सांगितलं होतं. पण आता विद्या बालनने दिलेल्या हिंटवरुन कार्तिकच्या आयुष्यात एक मिस्ट्री गर्ल असल्याचं स्पष्ट झालं आहे.