चार वर्षांनंतर विद्या बालनचं कमबॅक, मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी सज्ज; 'नीयत' चा फर्स्ट लुक आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 16:46 IST2023-06-21T16:44:54+5:302023-06-21T16:46:00+5:30
सिनेमाचा फर्स्ट लुक तिने सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे.

चार वर्षांनंतर विद्या बालनचं कमबॅक, मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी सज्ज; 'नीयत' चा फर्स्ट लुक आऊट
बॉलिवूडची एंटरटेन्मेंट क्वीन विद्या बालन (Vidya Balan) चार वर्षांनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बऱ्याच वर्षांनी विद्याचा चित्रपट येणार म्हणल्यावर चाहते उत्सुक आहेत. 'नीयत' या सिनेमात विद्या जासूसच्या भूमिकेत आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक तिने सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे.
विद्या बालनने 'डर्टी पिक्चर', 'कहानी' सारख्या सिनेमातून आपलं वेगळेपण आणि अभिनय कौशल्य दाखवलं आहे. आता 'नीयत' मधूनही ती प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. अनु मेनन दिग्दर्शित 'नीयत' हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर आहे. फर्स्ट लुकची सुरुवात एका व्हॉईस ओव्हरने होते. 'संदिग्ध आ रहे है, मकसद बन रहे है, तैय्यार हो जाओ दोस्तो, एक सीक्रेट आ रहा है.' यावरुन स्पष्ट होतंय की ही एक मर्डर मिस्ट्री आहे. विद्या बालनने मीरा राव ही भूमिका साकारली आहे.
'नीयत' चा फर्स्ट लुक अनेकांच्या पसंतीस पडला आहे. तसंच हा सिनेमा हॉलिवूड फिल्म 'नाइव्ह्ज आऊट' चा रिमेक असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सिनेमाचं शूट लंडनमध्ये झालं आहे. यामध्ये विद्या बालनसह राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, दिपानिता शर्मा, प्राजक्ता कोळी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. ७ जुलै रोजी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.