डोक्याला हात लावून बसली होती vidya balan, पण पुढे जे घडलं ते भारी होतं; पाहा मस्त व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:43 PM2021-11-10T15:43:35+5:302021-11-10T15:43:57+5:30

क्षणात vidya balan चा मूड बदलला आणि... पाहा व्हिडीओ

vidya balan sitting in sad mood suddenly everything changed | डोक्याला हात लावून बसली होती vidya balan, पण पुढे जे घडलं ते भारी होतं; पाहा मस्त व्हिडीओ!

डोक्याला हात लावून बसली होती vidya balan, पण पुढे जे घडलं ते भारी होतं; पाहा मस्त व्हिडीओ!

googlenewsNext

 एक काळ असा होता की विद्या बालनला (Vidya Balan ) फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘पनवती’ मानलं जायचं. कोणीही तिला काम देईना. पण ‘परिणीता’ चित्रपटात काम मिळालं आणि सर्व काही बदललं. आज विद्या एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
लवकरच विद्याचा ‘जलसा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण त्याआधी विद्याचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 
‘दिवाळी संपली? पण मला यापैकी कोणताच लुक दाखवण्याची संधी मिळाली नाही,’ असं म्हणत विद्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला विद्या डोक्यावर हात मारून बसलेली दिसतेय. यानंतर ती आळस झटकून उठते आणि मग एकापाठोपाठ एक असे तिचे अनेक लूक समोर येतात. मॉडर्न ते ट्रॅडिशनल लूकमध्ये ती दिसते. 2 तासांत विद्याच्या या व्हिडीओला 55 हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

आज विद्या आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण इथपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. द डर्टी पिक्चर,  कहानी, कहानी 2, तुम्हारी सुलु,  शकुंतला देवी  या आणि अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनय करून तिने प्रेक्षकांच्या मनावर तिची छाप पाडली. आज इतर अभिनेत्रींपेक्षा हटके काहीतरी करणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली. पण सुरूवातीच्या काळात ‘पनवती’ म्हणून तिला हिणवलं गेलं आणि पुढे तिच्या वजनावरून तिला ट्रोल केलं गेलं. 
तिच्या आयुष्यात नेहमीच हॉर्मोनल इशू होते. त्यामुळे कधी तिचं वजन वाढत होतं. ते कधी कमी व्हायचं. तिच्यावर   बारीक दिसण्याचा दबाव असतानाच नेमकी ती  मी जाड दिसायची. याकाळात तिला तिच्या शरीराचा राग यायचा. पण नंतर तिने स्वत:ला स्वीकारलं आणि मग तिचं जगचं बदललं.

Web Title: vidya balan sitting in sad mood suddenly everything changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.