विद्या बालनने मध्य प्रदेशच्या जंगलात सुरूवात केली 'या' चित्रपटाच्या शूटिंगला

By तेजल गावडे | Published: October 21, 2020 02:45 PM2020-10-21T14:45:54+5:302020-10-21T14:46:26+5:30

लॉकडाउननंतर विद्या बालनने आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.

Vidya Balan started shooting for this movie in the jungles of Madhya Pradesh | विद्या बालनने मध्य प्रदेशच्या जंगलात सुरूवात केली 'या' चित्रपटाच्या शूटिंगला

विद्या बालनने मध्य प्रदेशच्या जंगलात सुरूवात केली 'या' चित्रपटाच्या शूटिंगला

googlenewsNext

बॉलिवूडची उलाला गर्ल अभिनेत्री विद्या बालन हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. विद्या बालन शेवटची गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. आता ती शेरनी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला तिने नुकतीच सुरूवात केली आहे.

अभिनेत्री विद्या बालन हिने मध्य प्रदेशमध्ये आगामी चित्रपट शेरनीच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. कोरोनामुळे मार्चच्या मध्यात शेरनीचे शूटिंग थांबवण्यात आले होते. आता आवश्यक त्या काळजीसोबत मध्य प्रदेशमध्ये विद्या बालनने शेरनीचे शूटिंग सुरू केले आहे.


अमित मसुरकर दिग्दर्शित शेरनी चित्रपटात विद्या बालन वन अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगला मध्य प्रदेशमधील घनदाट जंगलात सुरूवात केली आहे.


नुकतीच विद्या बालन शकुंतला देवी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. कोरोना आणि लॉकडाउनमुळे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता.या चित्रपटात विद्या बालनने साकारल्या शकुंतला देवीचे सगळीकडून खूप कौतूक झाले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन वेटिंग, फोर मोर शॉट्स प्लीज़ सीजन 1 चे दिग्दर्शक अनु मेनन यांनी केले असून अभिनेत्री सान्‍या मल्‍होत्रा शंकुतला देवीच्‍या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शंकुतला देवीचे तिच्‍या मुलीसोबत जटिल, पण असाधारण नाते होते. तसेच या चित्रपटामध्‍ये जीशू सेनगुप्‍ता आणि अमित साध हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. विद्या बालनचे चाहते तिला नव्या भूमिकेत पहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

Web Title: Vidya Balan started shooting for this movie in the jungles of Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.