Vidyut Jammwal: बॉलिवूडच्या अॅक्शन स्टारने बर्फाळ तलावात मारली उडी, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 22:03 IST2022-02-25T22:02:36+5:302022-02-25T22:03:32+5:30
Vidyut Jammwal: विद्युत जामवालचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Vidyut Jammwal: बॉलिवूडच्या अॅक्शन स्टारने बर्फाळ तलावात मारली उडी, पाहा व्हिडिओ
बॉलिवूडचा अॅक्शन स्टार विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. विद्युत अनेकदा त्याचे फोटो आणि मार्शल अॅक्टचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. विद्युतने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो एका बर्फाच्या तलावात डुबकी मारताना दिसत आहे.
विद्युत जामवालने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो बर्फाच्छादित मैदानात दिसतोय. परिसरात सर्वत्र बर्फाची दाट चादर पसरलेली आहे. अशा वातावरणात विद्युत आधी आपले कपडे काढतो आणि नंतर बर्फाळ तलावात उतरतो. विद्युत व्हिडीओमध्ये सांगतो की, यावेळी त्या ठिकाणचे तापमान -8 अंश आहे.
चाहत्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला असून, व्हिडीओवर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने व्हिडिओवर कमेंट केली - 'द रिअल सुपरहिरो'. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'सर, तुम्हाला असे करताना पाहून मला इथे घरी बसून थंडी वाजते आहे.' विद्युतच्या या व्हिडिओवर काही सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विद्युतची फिल्मी कारकीर्द
विद्युतने त्याच्या करिअरची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपटातून केली होती. तर, जॉन अब्राहमच्या फोर्स या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर विद्युतने कमांडो, बुलेट राजा, जंगली, खुदा हाफिज, बादशाहो अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सनक हा विद्युतचा शेवटचा चित्रपट होता.