Video : 18 मिनिटांच्या व्हिडीओत सिद्धार्थ शुक्लाला आठवून अनेकदा रडला विद्युत जामवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 04:10 PM2021-09-08T16:10:27+5:302021-09-08T16:11:10+5:30
लाईव्ह येत सिद्धार्थ शुक्लाला दिली अनोखी श्रद्धांजली, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक
सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला. त्याची अकाली एक्झिट चटका लावणारी आहे. यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा एक तारा अचानक लुप्त झाला आणि त्याला ओळखणारा, त्याच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण हळहळला. बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) यापैकीच एक. विद्युत व सिद्धार्थ दोघेही चांगले मित्र होते. सिद्धार्थच्या निधनामुळे विद्युत अस्वस्थ आहे. आज त्याने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत सिद्धार्थला श्रद्धांजली अपर्ण केली. सोबत त्याच्या काही आठवणीही शेअर केल्या. यादरम्यान अनेकदा विद्युतला अश्रू रोखता आले नाहीत.
विद्युतने एका शांती श्लोकाने लाईव्हची सुरूवात केली. सिद्धार्थ व त्याच्या पहिल्या भेटीबद्दल त्याने सांगितले. तो म्हणाला, 2004 मध्ये मी मुंबईत पहिल्यांदा सिद्धार्थला भेटलो होतो. जिममध्ये आमची भेट झाली होती आणि बघता बघता जिम पार्टनर्सचे आम्ही बेस्ट फ्रेन्ड बनलो होतो. त्या पहिल्या भेटीत त्याने कोणते कपडे घातले होते, हे मी कधीच विसरलो नाही. त्याला पाहून मी इंम्प्रेस झालो होतो. गेल्या 15 जुलैला आमची शेवटची भेटलो होतो. मी खूप नशिबवान आहे की, तो माझा मित्र होतो. तो जवळच्या लोकांवर मनापासून प्रेम करायचा. आईवर तर त्याची विशेष माया होती. मी माझ्या आईवर करतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रेम तो आपल्या आईवर करायचा. कधीकधी मला त्याचा हेवा वाटायचा.
18 मिनिटांच्या या व्हिडीओत सिद्धार्थच्या आठवणी सांगताना विद्युत अनेकदा भावुक झाला. आपल्या लाडक्या मित्राबद्दल बोलताना त्याचा अनेकदा दाटून आले.
विद्युतच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. केवळ दोन तासांत 62 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.