साखरपुडा मोडल्यावर भावूक झाला विद्युत जामवाल; म्हणाला, 'खूप सुंदर क्षण होता पण...'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 12:03 PM2023-11-23T12:03:22+5:302023-11-23T12:06:18+5:30
अभिनेता विद्युत जामवालने 'कमांडो', 'सनक', 'खुदा हाफिज' यांसारख्या चित्रपटातून लोकांची मने जिंकली आहेत.
बॉलिवूडचा कमांडो अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल. २०२१ सप्टेंबरमध्ये विद्युतने डिझायनर नंदिता महतानीसोबत साखरपुडा केला होता. नंदिता आणि विद्युत यांनी स्वत: ताजमहालसमोर अंगठी घातलेले फोटो इंटरनेट मीडियावर व्हायरल झाले होते. पण, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर दोघेही एकमेकांपासून अंतर राखताना दिसले होते. यावर आता विद्युतने भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत विद्युतने सांगितले की, 'मी प्रेमात पडलो आणि साखरपुडा झाला. तो खूप सुंदर क्षण होता. मग मी आणि तिने (नंदिता) ठरवलं की थोडे थांबून लग्नाचा विचार करावा. आमच्यावर खूप दबाव होता. आता आम्ही या नात्यात थोडे हुळ-हळु पुढे जात आहोत'.
विद्युत म्हणाला, 'मी माझ्या आयुष्यात अनेक टप्पे पार केले आहेत. माझ्यासाठी डेटिंग खूप मजेदार नाही. मला प्रेमात पडणे आवडले. जर एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता. कोणत्याही नात्यात आनंदी राहणे महत्त्वाचे असते'.
Mumbai: Bollywood actor Vidyut Jammwal, who is currently making headlines for his recently released film Khuda Haafiz 2, has reportedly tied the knot with his fiance Nandita Mahtani. A report in ETimes says that the couple is likely to announced their wedding soon. However, an of pic.twitter.com/QpUbMNdORp
— Deccan News (@Deccan_Cable) July 12, 2022
नंदिता महतानी एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांसाठी काम केले आहे. नंदिताच्या आधी विद्युत आधी मोना सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 2 वर्षे दोघांचे अफेअर सुरू होते. विद्युतशी ब्रेकअप झाल्यानंतर मोनाने बिझनेसमॅन श्याम गोपालनसोबत लग्न केले.
विद्युत जामवालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो आगामी काळात 'शेर सिंग राणा' आणि 'क्रॅक' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनेता विद्युत जामवालने 'कमांडो', 'सनक', 'खुदा हाफिज' यांसारख्या चित्रपटातून लोकांची मने जिंकली आहेत. विद्युत जवळजवळ प्रत्येक चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसतो. विद्युत हा मार्शल आर्टिस्ट आहे आणि केरळच्या कलारीपट्टू मार्शल आर्ट्समध्ये तज्ञ आहे.