रश्मिका मंदानासोबतच्या रिलेशनशीपवर विजय देवरकोंडाने सोडले मौन, म्हणाला- ती माझी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 04:44 PM2022-07-29T16:44:32+5:302022-07-29T16:50:27+5:30
विजय देवरकोंडा रश्मिकाला 'डार्लिंग' म्हणून हाक मारतो असा खुलासा त्याने स्वत: केला आहे.
Vijay Devarakonda, Rashmika Mandanna relationship: विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) आणि अनन्या पांडे(Ananya Panday) हे सर्वात लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण' (koffee with karan season 7)मध्ये आले होते. दोन्ही स्टार्स पहिल्यांदाच करणच्या शोमध्ये आले आहेत. आपल्या शोमध्ये स्टार्ससमोर नेहमीच मोठमोठी सीक्रेर्ट उघड करणारा करण यावेळी देवरकोंडा आणि रश्मिका यांच्यातील नात्याबद्दल बोलला. यावर देवराकोंडाने त्याचे आणि रश्मिकाचे नातं काय आहे हे सांगितले.
रश्मिकाला डॉर्लिंग म्हणतो विजय देवरकोंडा
देवरकोंडा यांनी सांगितले की तो रश्मिकाला 'डार्लिंग' म्हणतो. आम्ही दोन चित्रपट एकत्र केले आहेत आणि मला ते खूप आवडतात. ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि आम्ही चित्रपट आणि आम्ही पर्सनल-प्रोफेशनल लाईफबाबत देखील चर्चा करतो.
'मला माझ्या प्रियजनांची मने तोडायची नाहीत'
देवराकोंडा यांनी सांगितले की, ज्या दिवशी माझे लग्न होईल आणि मुलं होतील, त्या दिवशी मी सर्वांना सांगेन आणि जोपर्यंत मी असे करत नाही तोपर्यंत मी माझ्या रिलेशनशिप स्टेटस मी सांगणार नाहीय देवराकोंडा पुढे सांगतात की, माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या घरात आणि फोनमध्ये माझे फोटो लावले आहेत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मला त्याचे हृदय तोडायचे नाही.
विजय देवरकोंडा पुरी जगन्नाथच्या लिगरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अनन्या पांडे देवराकोंडासोबत स्क्रीन शेअर करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देवरकोंडा आणि अनन्या करणच्या शोमध्ये आले आहेत. या चित्रपटात देवराकोंडा एका फायटरच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट यावर्षी २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.