विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ ठरतोय सुपरफ्लॉप; IMDb वरही मिळालं सर्वात कमी रेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 03:32 PM2022-08-28T15:32:53+5:302022-08-28T15:33:47+5:30
Liger : विजय आणि अनन्या पांडे यांनी देशातील अनेक वेगवेगळ्या शहरात फिरुन या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (vijay devarkonda) याचा लायगर (Liger Movie) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी नेटकऱ्यांमध्ये त्याची कमालीची चर्चा रंगली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट राज्य करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली आहे. बॉक्स ऑफिसवर सर्वात कमी गल्ला जमवाणाऱ्या या चित्रपटाला आता IMDb नेही अत्यंत कमी रेटिंग दिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
विजय आणि अनन्या पांडे यांनी देशातील अनेक वेगवेगळ्या शहरात फिरुन या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. इतकंच नाही तर आयएमडीबी साईटवर सर्वात कमी रेटिंग्स मिळालेला चित्रपट ठरला आहे.
‘आयएमडीबी’ने त्यांच्या साईटवर प्रेक्षकांनी सर्वात कमी रेटिंग्स केलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. यात २५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या लागरचाही समावेश आहे. त्यामुळे ‘आयएमडीबी’च्या मते, या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘लायगर’ हा सर्वात कमी रेटिंग असलेला भारतीय चित्रपट आहे.
दरम्यान, या चित्रपटाला आयएमडीबीने १० पैकी फक्त १.९ रेटिंग दिले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाध यांनी केलं असून विजय देवरकोंडाने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे, रम्या कृष्णन, राजीव रॉय, मकरंद देशपांडे हे कलाकार झळकले आहेत.