Liger Movie First Review : विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, समोर आला फर्स्ट रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 03:39 PM2022-08-05T15:39:17+5:302022-08-05T15:46:14+5:30

Liger movie first review out : ‘लाइगर’ या चित्रपटात विजय देवरकोंडा एका बॉक्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटात फर्स्ट रिव्ह्यू समोर आला आहे.

Vijay Deverakonda Ananya Panday Liger movie first review out | Liger Movie First Review : विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, समोर आला फर्स्ट रिव्ह्यू

Liger Movie First Review : विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, समोर आला फर्स्ट रिव्ह्यू

googlenewsNext

Liger movie first review out : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाची (Vijay Deverakonda) पहिली पॅन इंडिया मुव्ही येत्या 25 ऑगस्टला रिलीज होतेय. होय, आम्ही बोलतोय ते ‘लाइगर’ (Liger) या सिनेमाबद्दल. पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा एक अ‍ॅक्शन थ्रीलर स्पोर्ट ड्रामा आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा एका बॉक्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटात फर्स्ट रिव्ह्यू समोर आला आहे. होय, थेट सेन्सॉर बोर्ड रूममधून आलेला हा फर्स्ट रिव्ह्यू विजय देवरकोंडाच्या चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा आहे.

जबरदस्त अ‍ॅक्शन, धमाकेदार म्युझिक
सेन्सॉर बोर्ड रूममधून बाहेर आलेल्या रिव्ह्यूनुसार, विजय देवरकोंडा व अनन्या पांडेचा ( Ananya Panday) हा सिनेमा धमाकेदार आहे. परफेक्ट असं या चित्रपटाचं वर्णन करण्यात आलं आहे. 2 तास 20 मिनिटाच्या या चित्रपटाचा फर्स्ट हाफ 1 तास 15 मिनिटांचा आहे आणि सेकंड हाफ 1 तास 5 मिनिटांचा आहे. या चित्रपटात अनेक शानदार सीक्वेंन्स आहेत. धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्स आहेत. चित्रपटाची गाणीही कर्णमधूर आहेत. चित्रपटात एकूण 6 गाणी आहेत आणि ती सगळीच मनाचा ठाव घेणारी आहेत.

विजय देवरकोंडाचा अभिनय, त्याचे अ‍ॅक्शन सीन्स शिवाय अडखळत म्हटलेले त्याच्या संवादांनी सेन्सॉर रूमला चांगलंच इम्प्रेस केलं आहे. हा चित्रपट मास मुव्ही आहे आणि प्रेक्षकांना हा सिनेमा वेड लावेल, असंही सेन्सॉर रूमने म्हटले आहे. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या दिग्दर्शनाचंही कौतुक होतंय. इतकंच नाही तर लायगरच्या संपूर्ण स्टारकास्टला सुद्धा पैकीच्या पैकी मार्क्स देण्यात आले आहेत. 
विजय देवरकोंडाच्या आईच्या भूमिकेत असलेल्या राम्या कृष्णनच्या अभिनयाचं सेन्सॉर रूमने जबरदस्त कौतुक केलं आहे. तिची भूमिका पॉवरफुल आहे, तितकाच तिचा अभिनयही पॉवरफुल आहे. विजय देवरकोडा व अनन्या पांडेचा लव्ह अँगलही शानदार असल्याचं म्हटलं आहे. सेन्सॉर बोर्ड मेंबर्सनी या चित्रपटातील तांत्रिक बाबींची सुद्धा प्रशंसा केली आहे.

‘लाइगर’मध्ये विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे, राम्या कृष्णन, रोनिक रॉय, विष्णू रेड्डी, मकरंद देशपांडे हे कलाकारही आहेत. हा चित्रपट हिंदीसोबतच तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळममध्ये रिलीज होत आहे.  इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रसिद्ध माजी बॉक्सिंगपटू माइक टायसन हाही विजयसोबत स्क्रीन शेअर करत आहे.

Web Title: Vijay Deverakonda Ananya Panday Liger movie first review out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.