Total Disaster! विजय देवरकोंडाचा बॉलिवूड डेब्यू फसला, ‘Liger’चे 90 टक्के शो रद्द!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 05:25 PM2022-08-30T17:25:39+5:302022-08-30T17:26:07+5:30
Liger Box Office Collection Day 5 : साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाचा बॉलिवूड डेब्यू फसला असं म्हणायला हरकत नाही... ‘लाइगर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 90 टक्क्यांची घट झाली आहे...
Liger Box Office Collection Day 5 : साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाचा ( Vijay Deverakonda) बॉलिवूड डेब्यू फसला असं म्हणायला हरकत नाही. विजय देवरकोंडाबॉलिवूडमध्ये डेब्यू करणार म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. साऊथच्या सिनेमांचं क्रेझ बघता, त्याचा ‘लाइगर’ (Liger) बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणेल, अशीच सगळ्यांना अपेक्षा होती. पण झालं उलटं. पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसचे आकडे समोर आलेत आणि सगळं चित्र स्पष्ट झालं. एकीकडे चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचे निगेटीव्ह रिव्ह्यू मिळाले, दुसरीकडे बायकॉट बॉलिवूड मोहिमेनं होतं नव्हतं सगळ्यांवर पाणी फेरलं. आता स्थिती अशी आहे की, ‘लाइगर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 90 टक्क्यांची घट झाली आहे. रिपोर्टनुसार, केरळ, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये ‘लाइगर’चे 90 टक्के शो कॅन्सल करण्यात आले आहेत.
गेल्या गुरूवारी ‘लाइगर’ बॉक्स ऑफिसवर धडकला. पहिल्या दिवशी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 1.25 कोटींचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 4.50 कोटी, शनिवारी 4.25 कोटी गल्ला जमवला. रविवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळे ‘लाइगर’च्या कमाईत घट दिसली. रविवारी या चित्रपटाने केवळ 3.75 कोटींचा बिझनेस केला. सोमवारी हा आकडा 1.35 कोटींवर आला. म्हणजेच, पाच दिवसांत चित्रपटाने केवळ 15.10 कोटी कमावले.
‘लाइगर’चा हा बिझनेस बघता, पहिल्या आठवड्यात हा चित्रपट उणापुरा 18 ते 19 कोटींचा बिझनेस करेल, असं मानलं जात आहे.
#Liger is a Bigger Disaster than #Acharya (32.5%) in terms of ROI for the Buyers. It is unlikely to recover even 30%. There isn’t a single Theatre where it managed to collect Rent on Monday. Business as good as closed! pic.twitter.com/NPJO8cX1Sj
— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) August 30, 2022
पाच भाषांमध्ये केवळ इतके कमावले
‘लाइगर’ने गेल्या पाच दिवसांत सर्व 5 भाषांमध्ये केवळ 36.84 कोटींची कमाई केली आहे. धक्कादायक म्हणजे, चित्रपटाच्या तामिळ व्हर्जनलाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी ‘लाइगर’च्या तामिळ व्हर्जनने केवळ 27 लाख रूपयांचा बिझनेस केला.