साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडानं लाडक्या ‘मुमुलू’ला दिली अनोखी भेट, सोबत ठेवली ‘अशी’ अट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:26 PM2021-09-24T15:26:22+5:302021-09-24T15:27:47+5:30
काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडाने आपल्या मुमुलूला अर्थात आईला एक अलिशान घर गिफ्ट दिलं होतं. आता काय तर...
साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda )याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. तरूणींच्या गळ्यातील तो ताईत आहेत. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही कमी स्टायलिश नाही. लाईफ म्हणाल तर फुल्ल अलिशान. कधीकाळी याच विजय देवरकोंडाकडे घराचं भाडं द्यायला पैसे नव्हते. आज तो कोट्यवधींचा मालक आहे. काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडाने आपल्या मुमुलूला अर्थात आईला एक अलिशान घर गिफ्ट दिलं होतं. आता काय तर त्यानं एक अलिशान मल्टिप्लेक्स आईला गिफ्ट दिलं आहे.
Happy Birthday mummuluu ❤️
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) September 24, 2021
This one is for you! #AVD
If you workout and stay healthy, I will work harder and give you more memories 😘🤗 pic.twitter.com/edGhLLnGn0
होय, आज विजयची आई माधवी देवरकोंडा यांचा वाढदिवस. आईच्या वाढदिवशी विजयने तिचा मल्टिप्लेक्समधला एक फोटो शेअर केला आहे. या फोटो त्याची आई मल्टिप्लेक्समध्ये उभी दिसतेय. हा सुंदर फोटो शेअर करत त्यानं लिहिलं, ‘हॅपी बर्थ डे मुमुलू, हे तुझ्यासाठी आहे... एव्हीडी. तू वर्कआऊट करशील, तब्येतीला जपशील तर मी आणखी खूप मेहनत करेल आणि तुला खुप सुंदर आठवणी देईल...,’
विजयने खरेदी केलेल्या मल्टीप्लेक्सचं नाव ‘एव्हीडी सिनेमाज्’ आहे. नागा चैतन्य आणि साई पल्लवीचा ‘लव्हस्टोरी’ हा या मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होणारा पहिला सिनेमा आहे.
काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडाने आईला एक अलिशान घर गिफ्ट केलं होतं. 2019 मध्ये हैदराबादस्थित एक बंगला त्यानं खरेदी केला होता. या बंगल्याची किंमत 15 कोटी रूपये असल्याचं कळते. काही महिन्यांपूर्वी विजय देवरकोंडा या नव्या घरात शिफ्ट झाला होता. या घराच्या गृहप्रवेशाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.
9 मे 1989 रोजी एका तेलगू कुटुंबात विजय देवरकोंडाचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवरकोंडा गोवर्धन राव आहे. विजय देवरकोंडाचे कुटुंब त्याला राऊडी नावाने हाक मारतात. यामुळेच त्याचे चाहते त्याला राउडी देखील म्हणतात.
2011 साली विजयने मध्ये दक्षिण सिनेमातून पदार्पण केले. त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘नुव्विला’ असे होत़े. हा मल्टीस्टारर चित्रपट होता. यानंतर विजय देवरकोंडाने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. परंतु ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने खरी ओळख मिळाली. तो भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला.