काळा पैसा सफेद करण्यासाठी बनवला 'Liger' सिनेमा?; १५ तास ईडी चौकशी, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 04:59 PM2022-11-18T16:59:37+5:302022-11-18T17:00:57+5:30

विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, रम्या कृष्णन आणि माइक टायसन यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Vijay Deverakonda Liger In Trouble Puri Jagannadh Charmme Kaur Questioned By ED For black money | काळा पैसा सफेद करण्यासाठी बनवला 'Liger' सिनेमा?; १५ तास ईडी चौकशी, काय घडलं?

काळा पैसा सफेद करण्यासाठी बनवला 'Liger' सिनेमा?; १५ तास ईडी चौकशी, काय घडलं?

googlenewsNext

मुंबई - अभिनेता विजय देवरकोंडाचा 'लायगर' पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि सहनिर्माती चार्मी कौर यांच्यावर चित्रपटात काळ्या पैशाचा वापर केल्याचा आरोप आहे. १७ नोव्हेंबर रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुरी जगन्नाथ आणि चार्मी यांची १५ तास चौकशी करून लायगरच्या उत्पन्नाचे स्रोत जाणून घेतल्याचा दावा केला जात आहे. 

रिपोर्ट्सनुसार, परकीय चलनाच्या माध्यमातून लायगर सिनेमाच्या अवैध गुंतवणुकीबाबत पुरी आणि चार्मी यांची १५ ते १६ तास चौकशी करण्यात आली. काँग्रेस नेते बक्का जडसन यांनी ऑगस्टमध्ये ईडीकडे तक्रार दाखल केली त्यानंतर लायगरच्या टीमशी चौकशी सुरु झाली आहे. अनेक राजकारण्यांनी लायगरमध्ये पैसे गुंतवले होते. अनेकांनी पैसा मार्गी लावण्यासाठी आणि आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी चित्रपटात गुंतवणूक केल्याचेही त्यांनी आरोप केला.

ईडीने १५ दिवसांपूर्वी पुरी जगन्नाथ आणि चार्मीला नोटीस बजावून गुरुवारी हजर राहण्यास सांगितले होते. ईडीच्या अधिकार्‍यांनी दोघांची पैशाच्या स्रोताबाबत चौकशी केली. अनेक राजकीय नेते आणि कंपन्यांनी लायगर बनवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केल्याचाही अधिकाऱ्यांना संशय आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी परदेशातून पैसे मागवण्यात आले. १९९९ च्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (FEMA) अंतर्गत, चित्रपट बनवण्यासाठी परदेशी स्रोत वापरणे हा गुन्हा मानला जातो. यामुळेच ईडीने गुंतवणूकदारांच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी पुरी जगन्नाथ आणि चार्मीला समन्स बजावले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांना चित्रपटासाठी पैसे देणाऱ्या कंपनीचे किंवा व्यक्तींचे नाव जाणून घ्यायचे होते. चित्रपटासाठी वापरण्यात आलेला पैसा परदेशातून आल्याचा आरोप आहे. या चित्रपटासाठी आलेल्या फंडिंगमध्ये फेमाचे काही उल्लंघन झाले आहे का याचा तपास करण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर राजकारण्यांनी या चित्रपटाला फंडिंग देत काळा पैसा पांढरा केल्याचंही बोललं जात आहे. टॉलीवूडच्या सूत्रांनी सांगितले की, पुरी जगन्नाध आणि चार्मी यांनी मोठ्या फायद्याच्या अपेक्षेने लायगरमध्ये सुमारे १२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, रम्या कृष्णन आणि माइक टायसन यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. २५ ऑगस्ट २०२२ रोजी पाच भाषांमध्ये हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"


 

Web Title: Vijay Deverakonda Liger In Trouble Puri Jagannadh Charmme Kaur Questioned By ED For black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.