रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरच्या Animalचा टीझर पाहून विजय देवराकोंडा भारावला, म्हणाला, "माझी डार्लिंग..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 02:23 PM2023-09-29T14:23:20+5:302023-09-29T14:24:23+5:30

'अ‍ॅनिमल' सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर विजय देवराकोंडाने ट्वीट केलं आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका असलेल्या 'अ‍ॅनिमल'चा टीझर पाहून विजय भारावून गेला आहे.

vijay deverakonda praises rashmika mandanna after watching ranbir kapoor animal movie teaser | रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरच्या Animalचा टीझर पाहून विजय देवराकोंडा भारावला, म्हणाला, "माझी डार्लिंग..."

रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरच्या Animalचा टीझर पाहून विजय देवराकोंडा भारावला, म्हणाला, "माझी डार्लिंग..."

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रणबीरने २८ सप्टेंबरला त्याच्या वाढदिवशी 'अ‍ॅनिमल'चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत खास गिफ्ट दिलं. या चित्रपटात रणबीरबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत आहे. टीझरमध्ये तिची झलक पाहून चाहतेही सुखावले आहेत. अभिनेता विजय देवराकोंडानेही 'अ‍ॅनिमल'चा टीझर पाहिला. 

'अ‍ॅनिमल' सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर विजय देवराकोंडाने ट्वीट केलं आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका असलेल्या 'अ‍ॅनिमल'चा टीझर पाहून विजय भारावून गेला आहे. त्याने ट्वीट करत कलाकारांचं कौतुक केलं आहे. विजयने त्याच्या ट्वीटरवरुन 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. "माझे डार्लिंग्स रश्मिका मंदाना आणि संदीप वांगा यांना शुभेच्छा. आणि माझा फेव्हरेट रणबीर कपूर तुला हॅपी बर्थडे..तू बेस्ट आहेस," असं विजयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्या दोघांचे काही फोटोही व्हायरल  झाले होते. पण, अद्याप दोघांपैकी कोणीही याबाबत भाष्य केलेलं नाही. विजय देवराकोंडाच्या या ट्वीटमुळे आता या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. 

रणबीर कपूर आणि रश्मिकाचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर, रश्मिकासह अनिल कपूर आणि बॉबी देओलही मुख्य भूमिकेत आहेत. हिंदीसह इतर पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. 
 

Web Title: vijay deverakonda praises rashmika mandanna after watching ranbir kapoor animal movie teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.