साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडानं सोडलं मौन, सांगितलं रश्मिका मंदानासोबतच्या लग्नाचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:23 AM2022-02-22T11:23:35+5:302022-02-22T11:28:13+5:30
Vijay Deverkonda : सोमवारी अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला गेला होता की, दोघे यावर्षाच्या शेवटी लग्न करणार आहेत. आता विजय देवरकोंडाने त्याच्या आणि रश्मिकाच्या नात्यावर मौन सोडलं आहे.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) आणि नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या अफेअरची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. केवळ अफेअरच नाही तर दोघे लवकरच लग्न (Marriage) करणार असल्याचीही चर्चा होत आहे. दोघांना अनेकदा एकत्र बघण्यात आलं. त्यानंतर सोमवारी अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला गेला होता की, दोघे यावर्षाच्या शेवटी लग्न करणार आहेत. आता विजय देवरकोंडाने त्याच्या आणि रश्मिकाच्या नात्यावर मौन सोडलं आहे.
विजय त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्यावर एक ट्विट करत खुलासा केला आहे. त्याने लिहिलं की, 'नेहमीप्रमाणे वायफळ चर्चा...आपण केवळ द न्यूजवर प्रेम करत नाही का?'. विजयचं हे ट्विट लगेच व्हायरल झालं. विजयने हे ट्विट करून त्याच्या आणि रश्मिकातील नात्याला नाकारलं आहे.
As usual nonsense..
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) February 21, 2022
Don’t we just
❤️ da news!
रश्मिका आणि विजयने 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉमरेड' या दोन सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यानंतरच दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होत. त्यांची या सिनेमातील केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.
दोघांना अलिकडे काही वेळा एकत्र फिरताना, हॉटेलमध्ये एकत्र बघण्यात आलं. त्यासोबतच न्यू इअर सेलिब्रेशनही दोघांनी सोबत एन्जॉय केलं. दोघेही गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये होते. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चेने जोर धरला होता.