अनन्या पांडेसोबत विजय देवरकोंडाने केला मुंबईत ट्रेन प्रवास, अभिनेत्याच्या पायातील स्लीपरने वेधले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 06:09 PM2022-07-29T18:09:37+5:302022-07-29T18:10:20+5:30

Vijay Devarkonda And Ananya Panday's Ligar: विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा चित्रपट 'लाइगर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Vijay Deverakonda took a train ride in Mumbai with Ananya Pandey, the sleeper on the actor's feet caught everyone's attention | अनन्या पांडेसोबत विजय देवरकोंडाने केला मुंबईत ट्रेन प्रवास, अभिनेत्याच्या पायातील स्लीपरने वेधले सर्वांचे लक्ष

अनन्या पांडेसोबत विजय देवरकोंडाने केला मुंबईत ट्रेन प्रवास, अभिनेत्याच्या पायातील स्लीपरने वेधले सर्वांचे लक्ष

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा युवा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि अनन्या पांडे(Ananya Panday)चा चित्रपट 'लाइगर' (Ligar Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषेत रिलीज होणारा हा पॅन इंडिया चित्रपट आणि यातले कलाकार हा सगळ्यांचा उत्सुकतेचा विषय ठरत आहे. आज सकाळी विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाताना महागड्या गाड्या सोडून चक्क मुंबईच्या लोकल ट्रेनचा पर्याय निवडला. 

खार स्टेशनवरून लोअर परेल पर्यंत या दोघांनी ट्रेनने प्रवास केला. तसेच या चित्रपटाचे दुसरे गाणे वाट लगा देंगे ही आज रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलर, अकडी पकडी आणि आता वाट लगा देंगे हे गाणे पाहता प्रत्येक गटातील प्रेक्षक तसेच सर्व सामान्यांनाही आकर्षित करत आहे.


‘लाइगर’ हा एक स्पोर्ट्स अ‍ॅक्शन ड्रामा आहे. साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं तर करण जोहर याचा निर्माता आहे.

अनन्याचा हा पहिलाच तेलुगू चित्रपट असेल. हा चित्रपट हिंदीतही रिलीज होणार आहे. येत्या २४ ऑगस्टला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.

Web Title: Vijay Deverakonda took a train ride in Mumbai with Ananya Pandey, the sleeper on the actor's feet caught everyone's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.