अखेर मिळाली तारीख! 'या' दिवशी प्रदर्शित होणार विजय सेतुपती व कतरिना कैफचा बहुचर्चित 'मेरी ख्रिसमस'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 06:23 PM2023-11-23T18:23:34+5:302023-11-23T18:24:38+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Vijay Sethupathi and Katrina Kaif's 'Merry Christmas' to release on January 12, 2024. | अखेर मिळाली तारीख! 'या' दिवशी प्रदर्शित होणार विजय सेतुपती व कतरिना कैफचा बहुचर्चित 'मेरी ख्रिसमस'

अखेर मिळाली तारीख! 'या' दिवशी प्रदर्शित होणार विजय सेतुपती व कतरिना कैफचा बहुचर्चित 'मेरी ख्रिसमस'

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दोघेही काही दिवसांपासून त्यांच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच विजय-कतरिना एकत्र काम करत आहेत.

आज 'मेरी ख्रिसमस' सिनेमाच्या रिलीज डेटचा खुलासा झालाय. वारंवार या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात येत होती. आता अखेर हा सिनेमा पुढच्या वर्षी १२ जानेवरी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही माहिती कतरिनाने सोशल मीडियावर पोस्ट करुन शेअर केली आहे. २०२३ च्या डिसेंबर महिन्यात असलेल्या बॅक टू बॅक रिलीजमुळे निर्मात्यांनी 'मेरी ख्रिसमस'ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.

 हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर असल्याचं म्हटलं जात आहे.  रमेश तौरानी, ​​जया तौरानी, ​​केवल गर्ग आणि संजय रौट्री यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. तर श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कतरिना आणि विजयसोबत संजय कपूर, विनय पाठक, टिनू आनंद हे सहाय्यक भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात राधिका आपटे आणि अश्विनी काळसेकर यांच्या भूमिका आहेत. 

कतरिना कैफच्या 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाची टक्कर आता दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या 'फायटर' या सिनेमासोबत होणार आहे. दीपिका आणि हृतिकचा फायटर हा सिनेमा 2024 च्या जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांची टक्कर होणार आहे.

Web Title: Vijay Sethupathi and Katrina Kaif's 'Merry Christmas' to release on January 12, 2024.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.