Tamannaah Bhatia सोबतच्या अफेयर्सच्या वृत्तांवर विजय वर्मानं सोडलं मौन, लंच डेटचा केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 17:29 IST2023-01-18T17:29:14+5:302023-01-18T17:29:39+5:30
Vijay Varma And Tamannaah Bhatia : विजय वर्मा तमन्ना भाटियाला डेट करत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अखेर आता या वृत्तांवर अभिनेत्याने मौन सोडले आहे.

Tamannaah Bhatia सोबतच्या अफेयर्सच्या वृत्तांवर विजय वर्मानं सोडलं मौन, लंच डेटचा केला खुलासा
विजय वर्मा (Vijay Varma) तमन्ना भाटिया(Tamannaah Bhatia)ला डेट करत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अखेर आता या वृत्तांवर अभिनेता विजय वर्माने मौन सोडले आहे. त्याने 'लंच डेट'चा खुलासा केला आहे. तो दुसरा कोणी नसून दिग्दर्शक सुजॉय घोष आहे. वास्तविक तो तिच्यासोबत त्याच्या आगामी प्रोजेक्ट द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्ससाठी शूटिंग करत आहे.
यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र पार्टी करताना दिसले होते. यानंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसले. दोघेही मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. यानंतर दोघेही एका अवॉर्ड नाईटमध्ये दिसले. यानंतर दोघेही लंच डेटवर एकत्र दिसले. यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या.
My lunch date🤷🏻♂️@sujoy_ghttps://t.co/I9jT7gupzVpic.twitter.com/nKKW8S0vkH
— Vijay Varma (@MrVijayVarma) January 17, 2023
विजय वर्माने आता अफेअरच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी अनोखा मार्ग शोधला आहे. त्याने चित्रपट दिग्दर्शक सुजॉय घोषसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले आहे, माझी लंच डेट. विजय वर्माने ट्विटरवर एक फोटो अपलोड केला आहे. याशिवाय त्याने सुजॉय घोषलाही टॅग केले आहे. फोटोमध्ये तो सुजॉय घोषकडे बोट दाखवताना दिसत आहे. यावेळी विजयने निळ्या रंगाची हुडी आणि तपकिरी रंगाची पँट परिधान केली आहे. तर, सुजॉय घोषने राखाडी रंगाची पॅन्ट आणि पांढरा शर्ट परिधान केला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे, 'जेवण कुठे आहे?'
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांनी त्यांच्या नात्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. याआधी दोघेही वांद्रे येथे दिसले होते. त्या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये दोघेही गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये किस करताना दिसत होते.