तमन्ना भाटियाच्या प्रेमात आकंठ बुडालाय विजय वर्मा, म्हणाला - 'लग्नाबद्दल...'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 09:11 AM2023-07-21T09:11:21+5:302023-07-21T09:12:03+5:30
Vijay Varma And Tamannaah Bhatia : विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) त्याच्या 'कालकूट' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरीजमध्ये तो सकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. त्याची आई त्याच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकते, असे शोच्या टीझरमध्ये दाखवण्यात आले होते. आता अभिनेत्याने सांगितले की, खऱ्या आयुष्यातही त्याची आई लग्नाबद्दल विचारत असते.
डीएनए इंडियाशी संवाद साधताना तो म्हणाला, 'मी मारवाडी आहे. आपल्या समाजात मुलांसाठी लग्नाचे वय १६ वर्षे आहे. त्यामुळे हे सर्व माझ्यासोबत खूप लवकर सुरू झाले आणि खूप लवकर संपले कारण माझे लग्नाचे वय झाले होते आणि तोपर्यंत मी अभिनेता झालो होतो. तो पुढे म्हणाला की, मी मात्र या सगळ्याला फारसे महत्त्व दिले नाही. कारण माझ्यासमोर माझं करिअर होतं. म्हणूनच मी त्याकडे लक्ष दिले नाही. मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केले होते.
विजयची आई प्रत्येक फोनवर लग्नाबद्दल विचारते
जेव्हा विजयला विचारले गेले की आता त्याची आई पुन्हा लग्नाबद्दल विचारते का? त्यावर विजय हसला आणि म्हणाला, 'माझी आई अजूनही मला विचारते. ती आजही मला प्रत्येक फोन कॉलवर विचारते. पण मी तिला टाळतो. कारण मी माझ्या आयुष्यात चांगले काम करत आहे.
विजय आणि तमन्ना करताहेत एकमेकांना डेट
विजय वर्मा सध्या अभिनेत्री तमन्ना भाटियाला डेट करत आहे. दोघांनी लस्ट स्टोरी २ मध्येही एकत्र काम केले आहे. काही काळापूर्वी त्यांनी आपल्या नात्याची पुष्टी केली होती. त्यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडते.