विजय वर्माने दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली; सिने स्टाईलमध्ये म्हणाला - "जब प्यार किया तो डरना क्या"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:04 IST2023-09-04T11:59:35+5:302023-09-04T12:04:57+5:30
अभिनेता विजय वर्माने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली.

Vijay Varma
अभिनेता विजय वर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच दोघं मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. भरतात परतल्यानंतर दोघांना विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. सोशल मीडियावर देखील विजय आणि तमन्ना यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, दोघे देखील अनेक ठिकाणी एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. आता विजय वर्माने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली.
एका मुलाखतीमध्ये विजयला विचारण्यात आले की, त्याने इतर स्टार्सप्रमाणे आपले नाते लपवले का नाही? यावर अभिनेत्याने अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये उत्तर दिले की, 'मुगल-ए-आझममधील 'जब प्यार किया तो डरना क्या' हे गाणे मला खूप आवडते'. यापुर्वी तमन्नाने विजयला तिची हॅपी प्लेस म्हटले होते.
डार्लिंग्ज, लस्ट स्टोरीज 2 या चित्रपटाच्या यशावर तो म्हणाला की, प्रेक्षकांना पडद्यावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. पण, हे थोडे कठीण आहे. आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत मी इतके अपयश पाहिले आहे की मला यशाचा लोभ नाही. यशात मी हरवून जात नाही, ही माझी खासियत आहे, असे मला वाटते.
विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, विजय वर्माने यावर्षी अनेक वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. 'डार्लिंग', 'दहाड', 'कालकूट' आणि 'लस्ट स्टोरीज 2' सारख्या वेब शोमध्ये त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आहे.
तमन्ना हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीची ‘आखरी सच’ ही वेब सीरिज नुकताच प्रदर्शित झाली आहे. अभिनेते रजनीकांत स्टारर ‘जेलर’ सिनेमात देखील अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. तमन्ना आणि विजय नुकतेच 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र दिसले होते. शूटिंगच्या सेटवरही त्यांची भेट झाली. 'लस्ट स्टोरीज 2' सिनेमात दोघांनी इंटिमेट सीन दिले त्याचीही फारच चर्चा झाली.