"मला तर घामच फुटला कारण..." विजय वर्माने सांगितला करीनासोबत रोमान्सचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 01:48 PM2023-09-19T13:48:27+5:302023-09-19T13:49:20+5:30

करीना कपूर बॉलिवूडमधली सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

vijay varma talks about his experience of shooting romantic scene with kareena kapoor in JaaneJaan | "मला तर घामच फुटला कारण..." विजय वर्माने सांगितला करीनासोबत रोमान्सचा अनुभव

"मला तर घामच फुटला कारण..." विजय वर्माने सांगितला करीनासोबत रोमान्सचा अनुभव

googlenewsNext

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ओटीटीवर पदार्पण करत आहे. लवकरच तिचा 'जानेजान' (JaaneJaan) हा सिनेमानेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतोय. यामध्ये करीना पहिल्यांदाच विजय वर्मा (Vijay Varma) आणि जयदीप अहलावत (Jaydeep Ahlawat) या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हे दोघंही कलाकार ओटीटीवरचे बादशाह आहेत. तर करीना बिग स्क्रीनवर आघाडीवर असते.करीनासोबत रोमँटिक सीन करतानाचा अनुभव कसा होता हे विजय वर्माने नुकतंच त्याच्या खास शैलीत सांगितलं.

करीना कपूर बॉलिवूडमधली सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमात इंटिमेट सीन्स, किसींग सीन्स दिले आहेत. तर विजय वर्माने नुकतंच 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये तमन्ना भाटियासोबत इंटिमेट सीन्स दिले. आता विजय करीनासोबत रोमँटिक सीन करताना दिसणार आहे. याचाच अनुभव सांगताना विजय म्हणाला,'सिनेमात एक सीन आहे ज्यात करीना एका खास अंदाजात दिसत असते आणि गाणं म्हणत असते. जसा तो सीन आला मला तर घामच फुटला. तुम्ही ते सांभाळूच शकत नाही. करीनाच्या सौंदर्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. ती जेव्हा परफॉर्म करते तेव्हा आणखी सुंदर दिसते. तिच्या अदा तिला माहित आहेत.'

'जानेजान' २१ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. याच दिवशी करीनाचा वाढदिवसही आहे. या खास दिवशी ती ओटीटीवर पदार्पण करत आहे. हा सिनेमा एक मिस्ट्री मूव्ही असून विजय वर्मा आणि करीनाची केमिस्ट्री पाहता येणार आहे. तर जयदीप अहलावतही नेहमीप्रमाणे खास भूमिकेत दिसेल.  

Web Title: vijay varma talks about his experience of shooting romantic scene with kareena kapoor in JaaneJaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.